अजित पवारांचा दुपारी शपथविधी, आता मराठी अभिनेत्याचा रात्री शिंदे गटात प्रवेश!

अजित पवारांनी संपूर्ण राष्ट्रवादी पक्षावर दावा केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवारांना आपला पाठिंबा नसल्याचं सांगितलं आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना मराठी चित्रपटसृष्टीतील एका मराठी अभिनेत्याने शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे.

अजित पवारांचा दुपारी शपथविधी, आता मराठी अभिनेत्याचा रात्री शिंदे गटात प्रवेश!
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 11:21 PM

मुंबई : राज्यात राजकीय भूकंप झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आमदारांना सोबत घेत प्रवेश करत थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी संपूर्ण राष्ट्रवादी पक्षावर दावा केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवारांना आपला पाठिंबा नसल्याचं सांगितलं आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना मराठी चित्रपटसृष्टीतील एका मराठी अभिनेत्याने शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे.

कोण आहे तो मराठी अभिनेता?

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालेकमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता हार्दिक जोशी उर्फ (राणा दा) यासह अनेक कलाकारांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. लवकरच फिल्म इंडस्ट्री मधील बरेच कलाकार करणार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समजत आहे.

हार्दिक जोशी हा तुझ्यात जीव रंगला या मालिकेमधून घराघरात पोहोचला आहे. या मालिकेमध्ये त्याने राणा दा हे पात्र साकारलं होतं. पाठक बाई आणि राणा दा या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. हार्दिक जोशीनेही या मालिकेमध्ये दमदार अभिनय करत सिनेसृष्टीमध्ये आपली वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

राज्यातील राजकारणात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील वर्षी शिवसेना तर यंदा राष्ट्रवादीसारखा बळकट पक्ष फोडला. अजित पवार यांनाच हाताशी धरत त्यांनी शरद पवार यांना मोठा धक्का दिला आहे. आता काका-पुतणे एकमेकांविरोधात उभे ठाकले असून  दोघेही संख्याबळ जास्त असल्याचा दावा करत आहेत. मात्र आता काहीच दिवसात नेमकं पॉवरफुल हे जनतेच्या समोर येईल.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....