Uddhav Thackeray:हिंमत असेल तर विधानसभा निवडणुका घ्या;उद्धव ठाकरे यांचे भाजपा आणि बंडखोरांना आव्हान

उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुका घेण्याचे आवाहन दिले असल्याने आणि शिवसेनेच्या बंडखोर गटाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर दावा केल्याने हा संघर्ष आता आणखी पेटणार आहे. येत्या 11 जुलै रोजी न्यायालयाचा निकाल काय येणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Uddhav Thackeray:हिंमत असेल तर विधानसभा निवडणुका घ्या;उद्धव ठाकरे यांचे भाजपा आणि बंडखोरांना आव्हान
हिम्मत असेल विधानसभा निवडणुका घेऊन दाखवा उद्धव ठाकरेंचे आवाहनImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 3:10 PM

मुंबईः बंडखोरी नाट्य, त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाची राजीनामा, बहुमत चाचणी अशा घटनानी राज्यातील राजकारण ढवळून निघालं असताना आता शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच बंडखोर आमदारांनी (Rebel MLA) आपला दावा दाखल केला आहे. त्यामुळे शिवसेनेसह राजकीय वर्तुळात आता खळबळ माजली आहे. आता खरी शिवेसना उद्धव ठाकरे (F0rmer Chief Minister Uddhav Thackeray) यांची की बंडखोर आमदार एकनाथ शिंदे हा सवाल उपस्थित होत असतानाच शिवसेनेचे चिन्हावर आता दावा करण्यात येत आहे. एकीकडे हा संघर्ष टोकाला गेला असतानाच आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या चिन्हाबरोबरच विधानसभा निवडणुका घेऊन दाखवा असे थेट आवाहनच त्यांनी बंडखोर आमदारांच्या गटाला दिला आहे.

त्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेला बंडखोर आमदारांच्या गटाचे राजकारण आता टोकाला गेले असल्याचे दिसत आहे.

धनुष्यबाण चिन्ह हे शिवसेनेचेच

शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे, त्यांचा संघर्ष, शिवसेनेचा एकच असलेला आमदार ते अगदी छगन भुजबळ सोडून गेल्यापासूनचा संघर्ष सांगत त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणाविषयी आपले मत सांगितले. यावेळी धनुष्यबाण चिन्ह हे शिवसेनेचेच असणार आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवसेना आणि धनुष्यबाणाचा संघर्ष टोकाला जाणार

यावेळी त्यांनी विधिमंडळ पक्ष आणि रजिस्टर पक्ष याविषयीही सांगत धनुष्यबाण शिवसेनेचा राहणार असल्याचे सांगितले. शिवसेनेतून बंडखोरी करून गेलेल्या आमदारांना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला आणि भाजपला हिम्मत असेल तर आता विधानसभा निवडणुका घ्या असे थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाणाचा संघर्ष टोकाला जाणार हे आता स्पष्ट झालं आहे.

विधानसभा निवडणुका घेण्याचे आवाहन

यावेळी उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुका घेण्याचे आवाहन दिले असल्याने आणि शिवसेनेच्या बंडखोर गटाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर दावा केल्याने हा संघर्ष आता आणखी पेटणार आहे. येत्या 11 जुलै रोजी न्यायालयाचा निकाल काय येणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.