रायगड: वांगणी स्थानकात रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या लहानग्याची थरारक सुटका करणारा देवदूत मयुर शेळके (Mayur Shelke) याच्यावर कौतुकाचा आणि बक्षिसांचा वर्षाव होत आहे. मयुर शेळकेनं दाखवलेल्या शौर्यामुळं त्यांच्यावर बक्षिसाचां वर्षाव होत आहे. शेळके यांना रेल्वे कडून 50 हजारांचे पारितोषिक देण्याचं घोषित करण्यात आलं आहे. तर, जावा कपंनीनं मयुर शेळके यांना मोटारसायकल देणार असल्याचं घोषित केलं आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी मयुर शेळकेला फोन करुन अभिनदंन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) फोन करुन अभिनदंन केले. (Mayur Shelke Point man awarded by Indian Railway and Jawa Motorcycles after save life of six year boy)
मध्य रेल्वेचा पाँईटंमन मयुर शेळके मुबंई पुणे मार्गावरील वागंणी स्टेशनवर कर्तव्य बजावत असतात. 17 एप्रिलला वांगणी रेल्वे स्थानकात एक अंध आई आपल्या लहान मुलासह फ्लँटफाँर्मवर चालत असताना तीच्या मुलाचा तोल जाऊन तो रेल्वे ट्रँकवर पडला. त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने एक्सप्रेसही येत होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या 7 सेकंदात मयुर शेळके या जिगरबाज रेल्वे पाँईटमनने लहान मुलाचा जीव वाचवला. मयुर शेळके यांनी त्या मुलाला वाचवलेल्या थराराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 17 एप्रिलला घडलेल्या घटनेचा व्हिडीओ 19 एप्रिलला व्हायरल झाला आणि काही तासातच मयुर शेळके च्या पराक्रमाची चर्चा पूर्ण देशभरात सुरु झाली. त्यानतंर मयुर शेळकेचा रेल्वेतर्फे सत्कार करण्यात आला.
रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मयुर शेळकेला फोन करुन अभिनदंन केले. आता रेल्वे मत्रांलयातर्फे मयुर शेळकेला 50 हजार देऊन सन्मान करण्यात आला, तसे पत्र दिपक पिटर गाब्रियल – प्रिसिपंल एक्झुकेटिव्ह डायरेक्टर, रेल्वे बोर्ड यांनी मध्य रेल्वेच्या मुबंई येथील जनरल मॅनेजर ला लिहीले आहे.
जावा मोटारसायल कडून मयुर शेळकेला एक जावा मोटार सायकल देऊन गौरव करण्यात येत आहे, असे ट्विट जावा कपंनीचे अनुपम थरेजा यांनी केले आहे.
Pointsman Mayur Shelke’s courage has the Jawa Motorcycles family in awe. Humbled by his act of exemplary bravery, truly the stuff of legends. And we’d like to honour this brave gentleman by awarding him with a Jawa Motorcycle as part of the #JawaHeroes initiative. @RailMinIndia pic.twitter.com/QJfDJb5kr9
— Anupam Thareja (@reach_anupam) April 20, 2021
मयुरच्या शौर्याची दखल थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही घेतली. मयुर शेळकेला फोन करुन उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं. “तुमचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत. कल्पनेच्या पलिकडचं काम केलंत तुम्ही” अशा शब्दात ठाकरेंनी मयुरला कौतुकाची थाप दिली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याने अवघ्या सात सेकंदात रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या चिमुकल्याचे प्राण वाचवले होते.
मयुर शेळकेंनी असा वाचवला जीव
संबंधित बातम्या:
Video : अंध आईच्या हातातला मुलगा चालता चालता रेल्वे ट्रॅकवर पडला आणि तेवढ्यात रेल्वे आली…
(Mayur Shelke Point man awarded by Indian Railway and Jawa Motorcycles after save life of six year boy)