Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Western Railway Mega Block: आजपासून 3 दिवस पश्चिम रेल्वेवर ‘जम्बो मेगाब्लॉक’; 300 पेक्षा जास्त लोकल सेवा रद्द

पश्चिम रेल्वेने 24,25आणि 26 जानेवारीला'जम्बो मेगाब्लॉक घोषित केला आहे. मेगाब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वेवरील जवळपास 330 पेक्षा जास्त लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. पाहा रेल्वेचं वेळापत्रक कसं असणार आहे ते.

Western Railway Mega Block: आजपासून 3 दिवस पश्चिम रेल्वेवर 'जम्बो मेगाब्लॉक'; 300 पेक्षा जास्त लोकल सेवा रद्द
Follow us
| Updated on: Jan 24, 2025 | 1:19 PM

रविवार म्हटलं की मुंबईकरांच्या प्रवासाची पुरती वाट लागते. कारण रविवार हा सुट्टीचा अन् मेगाब्लॉकचा दिवस.त्यामुळे अनेक लोकल रद्द असतात आणि उशीराने धावणाऱ्या असतात.

पण या आठवड्यात फक्त रविवारच नाही तर चक्क तीन दिवस ‘जम्बो मेगाब्लॉक’ घेण्यात आला आहे. होय, पश्चिम रेल्वेने 24,25आणि 26 जानेवारीला’जम्बो मेगाब्लॉक घोषित केला आहे.

पश्चिम रेल्वेवर तीन दिवसांचा मेगाब्लॉक

वेस्टर्न रेल्वेने माहीम आणि वांद्रे मार्गावरील स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी हा ‘जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवर आजपासून पुढील तीन दिवस ‘जम्बो मेगाब्लॉक’ घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वेवरील जवळपास 330 पेक्षा जास्त लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे.याबद्दलची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. मेगाब्लॉकमुळे, शुक्रवार रात्रीपासूनच सुरु होणार आहे.

शुक्रवारी आणि शनिवारी रात्री 127 उपनगरीय सेवा रद्द केले जाणार आहे. शनिवार 150 उपनगरीय लोकल सेवा तर रविवारी रात्री 60 उपनगरीय सेवा रद्द केल्या जाणार आहे. 24 जानेवारी रात्री 11 ते शनिवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत माहीम आणि वांद्रे स्टेशन दरम्यान धीम्या गतीच्या मार्गावर परिवर्तीत केले जाणार आहे.

300 लोकल गाड्या रद्द

मेगा ब्लॉक दरम्यान डाऊन फास्ट मार्गावर देखील रात्री 12.30 ते सकाळी 6.30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. 25 आणि 26 जानेवारीला रात्री 11 ते रविवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत अप आणि डाऊन स्लो आणि डाऊन फास्ट मार्गांवर ब्लॉक सुरू होईल. जलद मार्गावर शनिवारी रात्री 11 वाजता ब्लॉक सुरू होऊन रविवारी सकाळी 7.30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.

तसेच 24 जानेवारीला शेवटची चर्चगेट-विरार स्लो लोकल रात्री 11.58 वाजता सुटणार आहे.रात्री 11 वाजेपासून चर्चगेटवरून सुटणाऱ्या सर्व स्लो लोकल मुंबई सेंट्रल आणि सांताक्रूझ दरम्यान जलद मार्गावरून धावणार आहेत. दरम्यान महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड स्थानकांवरील लोकलचा थांबा रद्द करण्यात येणार आहे.

शनिवारी सकाळी 6.14 वाजता सुटणार चर्चगेटवरून पहिली डाउन फास्ट लोकल

शनिवारी सकाळी 6.14 वाजता चर्चगेटवरून पहिली डाउन फास्ट लोकल सुटणार आहे. 24 जानेवारीला रात्री 11वाजता नंतर विरार, भाईंदर आणि बोरिवलीहून सुटणाऱ्या स्लो गाड्या सांताक्रूझ आणि मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर धावणार आहे.

गोरेगाव आणि वांद्रे येथे पश्चिम रेल्वे लोकल हार्बर मार्गावर धावणार आहे. 25 जानेवारी सकाळी विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईंदर आणि बोरिवली स्लो आणि फास्ट लोकल अंधेरी स्थानकवर थांबणार आहे. मेगाब्लॉकनंतर चर्चगेटकडे येणारी पहिली फास्ट लोकल शनिवारी सकाळी 5.47 वाजता विरारहून सुटणार असून सकाळी 7.05 वाजता पोहोचेल.

तर, चर्चगेटवरून पहिली डाउन फास्ट लोकल सकाळी 6.14 वाजता सुटेल आणि चर्चगेटवरून पहिली डाउन स्लो लोकल ब्लॉकनंतर सकाळी 8.03 वाजता सुटणार आहे. दरम्यान काही लांब पल्ल्याच्या रेल्वेही रद्द करण्यात आल्या आहेत.

लांब पल्ल्याच्या ‘या’ गाड्या रद्द असणार

12227 मुंबई सेंट्रल-इंदूर दुरांतो एक्सप्रेस (25th January 2025) 12268 हापा-मुंबई सेंट्रल दुरांतो एक्सप्रेस (26th January 2025) 09052 भुसावळ-दादर स्पेशल (25 जानेवारी 2025) –बोरिवलीपर्यंत 12267 मुंबई सेंट्रल-हापा दुरांतो एक्सप्रेस (25 जानेवारी 2025) 12228 इंदूर-मुंबई सेंट्रल दुरांतो एक्सप्रेस (26 जानेवारी 2025) 19003 दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस (26 जानेवारी 2025) – बोरिवली येथून निघते 19015 दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेस (२६ जानेवारी २०२५) – बोरिवली येथून निघते 22946 ओखा-मुंबई सेंट्रल सौराष्ट्र मेल (25 जानेवारी 2025) – बोरिवलीपर्यंतच असणार 12927 दादर-एकता नगर सुपरफास्ट एक्सप्रेस (25 जानेवारी 2025) – बोरिवली येथून निघते 12902 अहमदाबाद-दादर गुजरात मेल (25 जानेवारी 2025) – पालघरपर्यंतच असणार 59024 वलसाड-मुंबई सेंट्रल पॅसेंजर (26 जानेवारी 2025) – बोरिवलीपर्यंतच असणार 59045 मुंबई सेंट्रल-वापी पॅसेंजर (26 जानेवारी 2025) – बोरिवली येथून निघणार 19016 पोरबंदर-दादर सौराष्ट्र एक्सप्रेस (२४ जानेवारी २०२५) – बोरिवलीपर्यंतच असणार 12904अमृतसर-मुंबई सेंट्रल गोल्डन टेंपल मेल (24 जानेवारी 2025) – अंधेरीपर्यंतच असणार

'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर
'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर.
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल.
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?.
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर...
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर....
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?.
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट.
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण...
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण....
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्.
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल.
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी.