Megablock: मध्य आणि हर्बर लाईनवर रविवारी मेगाब्लॉक; ठाणे-कल्याण जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
मुंबईः ऐन पावसाळ्याच्या दिवसात रविवारी मेगाब्लॉक असणार असल्याने त्याचा त्रास आता मुंबईकरांना सोसावा लागणार आहे. रविवारी मध्य आणि हर्बर लाईनवर मेगाब्लाक असणार असल्याची माहित रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) येथून सकाळी 9,30 ते दुपारी 2.45 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद (Fast)/अर्ध जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यानच्या (Thane-kallyan) धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि वेळापत्रकानुसार थांबवल्या जातील व १० मिनिटे उशिराने पोहचणार आहेत. कल्याण येथून सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 पर्यंत सुटणाऱ्या जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर त्यांच्या वेळापत्रकानुसार थांबवल्या जातील, पुढे मुलुंड येथे जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि 10 मिनिटे उशिराने पोहोचतील.
हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या मार्गांवर पाच तासाचा ब्लॉक असणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
हार्बर मार्गावरील सेवा रद्द
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 पर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणा ऱ्या गाड्या हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आली आहे.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी हार्बर मार्गावरील आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी हार्बर मार्गावरील सेवाही रद्द करण्यात आली आहे.
विशेष सेवा चालवल्या जाणार
तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी असणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.