मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटले, मर्सिडीज दुभाजकावर आदळून मुंबईत भीषण अपघात

(Mercedes Car rams on Divider at Malabar Hill)

मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटले, मर्सिडीज दुभाजकावर आदळून मुंबईत भीषण अपघात
Follow us
| Updated on: Jan 14, 2021 | 7:56 AM

मुंबई : भरधाव मर्सिडीज कार डिव्हायडरवर आदळून मुंबईतील मलबार हिल परिसरात भीषण अपघात झाला. मांजरीला वाचवण्याचा प्रयत्न करताना कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Mercedes Car rams into Divider in Malabar Hill while saving Cat)

मुंबईतील मलबार हिल भागात मर्सिडीज कार दुभाजकावर आदळली. घटनेच्या वेळी कारमध्ये दोघे जण होते, मात्र कोणालाही दुखापत झालेली नाही. प्रवाशांच्या माहितीनुसार कारसमोर अचानक मांजर आल्यामुळे तिला वाचवण्याच्या नादात गाडीवरचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर मर्सिडीज कार डिव्हायडरवर चढली.

वसईत तवेरा कार पेटली

दुसरीकडे, वसईत धावत्या तवेरा गाडीने पेट घेतल्याची घटना घडली आहे. वसई पश्चिमेकडील सनसिटी परिसरात आज (गुरुवार) सकाळी 6 वाजता हा प्रकार घडला. ही टुरिस्ट गाडी असून गाडीतून गास गावातील काही जण महाबळेश्वरला फिरायला जाण्यासाठी निघाले होते. घरातून अवघ्या काही अंतरावर गेली असताना अचानक गाडीने पेट घेतला.

गाडीतील प्रवासी प्रसंगावधान राखून तात्काळ खाली उतरल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गाडीच्या इंजिनच्या आसपासचा भाग जळून खाक झाला आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवली. गाडीच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

पुण्यात कुत्र्याला वाचवताना कार कोसळली

पुण्यातील डेक्कन परिसरात कुत्र्याला वाचवताना अशाच प्रकारे डिसेंबर महिन्यात अपघात झाला होता. गाडी वेगाने जात असताना अचानक कुत्रे गाडीसमोर आले. कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडी गरवारे पुलावरुन भुयारी मार्गात कोसळली. त्यावेळीही कोणाला गंभीर दुखापत झालेली नव्हती. (Mercedes Car rams into Divider in Malabar Hill while saving Cat)

डेक्कन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज काळगुंदे (वय 24, रा. पाषाण) आणि इतर तिघे जण जंगली महाराज रोडवरील हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. जेवण झाल्यानंतर ते रात्री परत घरी जाण्यासाठी निघाले. मनोज काळगुंदेची कार गरवारे पुलाजवळ आली. त्यावेळी अचानक त्यांच्या कारसमोर कुत्रे आडवे आले. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात मनोजचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे कार थेट गरवारे पुलाचा कठडा तोडून भुयारी मार्गात कोसळली.

संबंधित बातम्या :

VIDEO | कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटले, पुण्यात गरवारे पुलावरुन कार खाली कोसळली

पुण्यात नवले ब्रिज परिसरात भीषण अपघात; मालवाहतूक ट्रकनं 7 ते 8 वाहनांना उडवले

(Mercedes Car rams into Divider in Malabar Hill while saving Cat)

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.