AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Migrant workers : मजुरांना पुन्हा लॉकडाऊनची भीती, घरी परतण्याची तयारी सुरु

राज्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊनच्या (Maharashtra secon lockdown) हालचाली सुरु झाल्या आहेत.

Migrant workers : मजुरांना पुन्हा लॉकडाऊनची भीती, घरी परतण्याची तयारी सुरु
Migrant workers Leaving mumbai
Follow us
| Updated on: Apr 03, 2021 | 1:26 PM

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊनच्या (Maharashtra secon lockdown) हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही तसा इशारा दिला आहे. जर पर्याय नसेल तर लॉकडाऊन लावला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी दरडावलं आहे. (Migrant workers Leaving Mumbai as fear of Maharashtra second lockdown after CM Uddhav Thackeray interaction)

मात्र गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये झालेले हाल पुन्हा होऊ नयेत, या भीतीने मुंबईसह मोठ्या शहरातील मजुरांनी आपल्या गावचा रस्ता धरला आहे. परिणामी उत्तर प्रदेश, बिहार, पाटणा, झारखंडला जाणाऱ्या रेल्वे फुल्ल होत आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे भविष्य धुसर असल्याने दुकाने ,उपहारगृहे ,लहान कंपन्यांमधील कामगार , लघु व्यवसायिक ,रोजंदारीवरील मजूर टाळेबंदीच्या चिंतेने हवालदिल झाले आहेत. तसेच लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. आता परत तेच दिवस नको या भीतीने कामगारांनी घराची वाट धरली आहे.

आधीपासून खबरदारी

मुंबईतून अनेक कामगार आपल्या गावी परतत असल्याचं चित्र आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे अनेक जण अडकून पडले होते. त्यामुळे यंदाही तशीच परिस्थिती उद्भवू नये यासाठी विस्थापित कामगार आधीपासूनच खबरदारी घेत आहेत.

नांदेडमधील मजूरही गावी निघाले

नांदेडमध्ये लॉकडाऊन लावल्यामुळे परप्रांतीय मजूर आपल्या गावी जात आहेत. काही दिवसापूर्वीच नांदेडच्या रेल्वे स्थानकांवर शेकडो मजुरांनी प्रवासासाठी गर्दी केली होती. काहींनी तात्काळमध्ये प्रवासाचे आरक्षण काढून गावाकडचा रस्ता धरला. तर काही जणांची जमेल तसा प्रवास करण्याची तयारी आहे.

मुख्यमंत्र्यांचा लॉकडाऊनचा इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. “आधी जीव वाचले पाहिजे, मग पुढचं बघू, आज पूर्ण लॉकडाऊन इशारा देतोय. पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही तर जग जे करतंय तोच पर्याय स्वीकारावा लागेल”, असा थेट इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनशिवाय जो पर्याय असेल तो सांगा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

पुण्यात मिनी लॉकडाऊन

पुण्यात पुढील सात दिवसांसाठी अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. आजपासून पुढील सात दिवस हे नियम लागू राहतील.

संबंधित बातम्या 

मुख्यमंत्री म्हणाले, दोन दिवसात कठोर निर्णय, आता 4 एप्रिलपासून नवे नियम काय असू शकतात?

(Migrant workers Leaving Mumbai as fear of Maharashtra second lockdown after CM Uddhav Thackeray interaction)

ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.