VIDEO | महाविकास आघाडी चषकात मिलिंद नार्वेकरांची तुफान फटकेबाजी

मुंबईतील विक्रोळी पार्कसाईटमध्ये आयोजित 'महाविकास आघाडी चषक' स्पर्धेत मिलिंद नार्वेकर मैदानात उतरले (Milind Narvekar batting Cricket Match)

VIDEO | महाविकास आघाडी चषकात मिलिंद नार्वेकरांची तुफान फटकेबाजी
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 8:47 AM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना पडद्यामागे राहून ‘राजकीय फलंदाजी’ करताना अनेकांनी पाहिलं आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई प्रीमियर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर नार्वेकरांना प्रत्यक्ष मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. मिलिंद नार्वेकर यांनी मैदानात चौफेर फटकेबाजी करत उपस्थितांची वाहवा मिळवली. (Milind Narvekar batting in Mahavikas Aghadi Cricket Trophy Match)

मुंबईतील विक्रोळी पार्कसाईटमध्ये रविवारी ‘महाविकास आघाडी चषक’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थिती लावली होती. कै. हिंदुराव देशमुख यांच्या स्मरणार्थ ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत नार्वेकरांनी तूफान फटकेबाजी केली.

मिलिंद नार्वेकरांची क्रिकेट क्षेत्रात वाटचाल

मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारत मिलिंद नार्वेकर यांनी क्रिकेट क्षेत्रात आपली वाटचाल सुरु केली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 29 डिसेंबरला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधरण सभेत (AGM) मिलिंद नार्वेकर आणि सुरेश सामंत यांची MPL च्या गव्हर्निंग कौन्सिलच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. दुसऱ्याच दिवशी नार्वेकरांकडून मुंबईकरांना नववर्षाच्या शुभेच्छा देणारी पोस्टर्स मुंबईत लावण्यात आली.

मिलिंद नार्वेकर यांची एमपीएलच्या चेअरमनपदी निवड होणं अपेक्षित मानलं जात होतं. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यानंतर मोठ्या कालावधीनंतर मिलिंद नार्वेकरांच्या रुपाने शिवसेनेची एमसीएच्या कार्यक्षेत्रात थेट एन्ट्री झाली आहे.

मिलिंद नार्वेकरांचा अल्पपरिचय

मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. गटप्रमुख ते उद्धव ठाकरेंचे सचिव ते आता शिवसेना सचिव असा मिलिंद नार्वेकरांचा राजकीय प्रवास राहिला आहे.

मिलिंद नार्वेकर काही वर्षांपूर्वी मातोश्रीवर शाखाप्रमुख पदाच्या मुलाखतीसाठी गेले होते. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांची नजर मिलिंद नार्वेकरांवर गेली. मिलिंद नार्वेकर यांच्यातील हुशारी, संवाद कौशल्य या गुणांमुळे मिलिंद नार्वेकरांची उद्धव ठाकरेंच्या पीए म्हणून निवड झाली. तेव्हापासून ते आजतायागत नार्वेकर हे अनेक जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडत आहेत.

संबंधित बातम्या :

MPL च्या गव्हर्निंग कौन्सिलच्या चेअरमनपदी मिलिंद नार्वेकर बिनविरोध

…आणि म्हणून मिलिंद नार्वेकर शरद पवारांच्या पाया पडले

(Milind Narvekar batting in Mahavikas Aghadi Cricket Trophy Match)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.