Ajit pawar DCM : अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी; सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
या सर्व घडामोडींवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्या या निर्णयाचे पडसाद राज्यात चांगलेच उमटले. त्यातील काही किस्से आपण पाहणार आहोत.
मुंबई : अजित पवार यांनी अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ पैकी ४० आमदार आहेत. त्यापैकी ९ जणांनी शिंदे-भाजप सरकारमध्ये मंत्रीपदाचीही शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मंत्रीपदावरही दावा केलाय. या सर्व घडामोडींवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्या या निर्णयाचे पडसाद राज्यात चांगलेच उमटले. त्यातील काही किस्से आपण पाहणार आहोत.
अजित पवार राज्यात आल्यामुळे उद्या किंवा परवा देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जातील.
अजित दादा धडाडीचे, कार्यक्षम नेते आहेत. दादांचा दरारा या पोस्ट टाकू नये. आता सिंचन घोटाळा, धरण भ्रष्टाचार या पोस्ट सुरू कराव्यात.
एकदा मतदान केलं आणि तीन मुख्यमंत्री आणि चार उपमुख्यमंत्री मिळाले.
महिन्याभरात एकनाथ शिंदे यांना नारळ देतील, असे दिसते.
ज्या नरेंद्र मोदी यांनी ७० हजार कोटी रुपये घोटाळ्याचा आरोप केला त्या कथीत घोटाळ्याच्या सूत्रधारांना सन्मानाने बोलावून राज्य मंत्रीमंडळात स्थान दिलं.
दादा पहाटेही झोपू देत नाहीत आणि दुपारीही नाही.
शिंदे सरकारचा बहुचर्चित रखडलेला विस्तार अखेर आज पार पडला. विस्तार एवढा मोठा झाला की विरोधी पक्षनेत्यालासुद्धा सामावून घेऊन उपमुख्यमंत्री केले.
आता देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल हे केंद्रीय मंत्रीमंडळात जाणार, अशाही चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. या सर्व प्रतिक्रियांमुळे सोशल मीडियावर चांगलेच मनोरंजन होत आहे. पण, या सर्वांमध्ये किती तत्थ्य आहे, हे काही सांगता येत नाही.
महाराष्ट्राचे राजकीय वादळ, गंदा हैं पर धंदा है, असं ट्वीट खासदार इम्तियाज जलील यांनी केलं.
सासुमुळे वाटणी केली आणि सासुच वाट्याला आली.