राज्यपालांनी अर्थ संकल्पीय अधिवेशनासोबत 12 रिक्त जागांविषयी देखील काळजीने निर्णय घ्यावा : अनिल परब

राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 रिक्त जागांच्या मुद्द्यावरुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना टोला लगावलाय.

राज्यपालांनी अर्थ संकल्पीय अधिवेशनासोबत 12 रिक्त जागांविषयी देखील काळजीने निर्णय घ्यावा : अनिल परब
अनिल परब, परिवहन मंत्री
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 5:46 PM

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 रिक्त जागांच्या मुद्द्यावरुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना टोला लगावलाय. राज्यपालांनी अर्थ संकल्पीय अधिवेशनाबाबत जशी काळजी दाखवली तशीच काळजी दाखवत विधान परिषदेच्या रिक्त 12 जागांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी अनिल परब यांनी केलीय. ते मुंबईत बोलत होते (Minister Anil Parab criticize Governor Bhagatsingh Koshyari over delay in MLA appointment).

अनिल परब म्हणाले, “पूर्वी ठरलेला 3 आठवड्यांचा कार्यक्रम आजच्या बैठकीत मांडण्यात आला. अधिवेशनाचे कामकाज कसे चालेल यावर देखील चर्चा झाली. 25 फेब्रुवारीला पुन्हा एकदा बैठक होईल आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम आखला जाईल. राज्यपालांचे पत्र आले आहे. निवडणूक कुठल्या दिवशी घ्यायची हे कॅबिनेटच्या बैठकीत ठरेल. राज्यपालांनी जशी अर्थ संकल्पीय अधिवेशनाबाबत काळजी दाखवली त्याचप्रमाणे काळजी दाखवत विधान परिषदेच्या 12 रिकाम्या जागांवर अधिवेशनाआधी निर्णय घ्यावा.”

“रिक्त पदांसंदर्भात कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल आणि मग तो निर्णय राज्यपाल यांना कळवण्यात येईल. राज्यपालांनी घटनात्मक विचार आणि काळजी व्यक्त केली. त्यांना आम्ही विधान परिषदेच्या 12 रिक्त जागांची आठवण करून देतो,” असंही अनिल परब यांनी नमूद केलं.

अनिल परब म्हणाले, “आज कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. अधिवेशनास संदर्भातील विषय देखील सांगण्यात आले आहेत. सरकार कुठल्याही चर्चेला घाबरत नाही. कोरोना रुग्णांची संख्या पाहता त्यावर चर्चा झाली. अधिवेशनाच कामकाज हे दोन टप्प्यात होईल. 25 फेब्रुवारीला पुन्हा बैठक होईल, त्यात अंतिम निर्णय होईल. अर्थसंकल्प 8 मार्चला मांडण्याचं ठरलं आहे. पण अंतिम निर्णय 25 फेब्रुवारीला होईल.”

हेही वाचा :

लॉकडाऊनचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला, परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

एसटीतील ‘त्या’ कर्मचाऱ्यांचं पुन्हा प्रशिक्षण होणार; कोरोना काळात घेतलेला निर्णय अखेर मागे

25 वर्ष विना अपघात सेवा देणार्‍या एसटी चालकांना 25 हजारांचे बक्षीस, अनिल परबांची मोठी घोषणा

व्हिडीओ पाहा :

Minister Anil Parab criticize Governor Bhagatsingh Koshyari over delay in MLA appointment

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.