तुम्ही कुणाचाही पाठिंबा घ्या, पण बाळासाहेबांच्या विचारांपासून मात्र तुम्ही लांब गेला आहात, ठाकरे गटाच्या कर्तृत्वावरच या नेत्याचा सवाल…
तुम्ही कुणाला भेटता, कुणाचा पाठिंबा घेता यावर आम्हाला काय म्हणायचच नाही पण जे तुम्ही खोटं बोलणं चालू केलं आहे ते तात्काळ थांबवा असा सल्लाही त्यांनी या दोघांना दिला आहे.
मुंबईः एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून प्रेमाचा वारसा एकनाथ शिंदे यांना मिळाला असल्यानेच आज आम्ही त्यांच्यासोबत आहोत असं स्पष्टीकरण देत शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ज्या लोकांनी सत्ता असतानाही अडीच वर्षात उच्च स्तरिय समितीची एकही बैठक घेऊ शकले नाहीत. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा टोला दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना लगावला आहे.स
सध्या उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून राज्यातील उद्योग धंदे बाहेरील राज्यात गेले म्हणून शिंदे गटावर टीका केली जात आहे.
मात्र यामागील खरं दुःख आहे ते तुमची सत्ता गेल्यामुळे तुम्ही शिंदे गटावर टीका करत आहात अशी टीका दीपक केसरकर यांनी केली आहे.
आमच्यावर खोके सरकार म्हणून टीका होत असली तरी, एकनाथ शिंदे यांच्या प्रेमळ स्वभावामुळे आम्ही त्यांच्यासोबत गेलो असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
अडीच वर्षात तुम्ही साधं कधी कुणाला भेटू शकला नाही. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरातून प्रत्येक आमदारासाठी जेवणाचा डबा येतो. हा प्रेमळ पण त्यांनी जपला आहे.
त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहे. आणि हा प्रेमाचा वारसा त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिळाला असल्याचेही दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.
उद्योग व्यवहार बाहेर जाता, तुमच्या पोटामध्ये दुखत सत्ता गेली म्हणून तु्म्ही कुणाला भेटू शकत नव्हता, एकनाथ शिंदे यांच्या एक वैशिष्ट्य आहे.
त्यांच्या घरातून प्रत्येक आमदाराला डबा येत होता, त्यामुळे हा प्रेमळ नातं कोणी विसरू शकत नाही, तुम्ही एकदा तरी जेवायला बसला आहात का. बाळासाहेबांचा प्रेमाचा वारसा एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
दीपक केसरकर यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, तुम्ही काँग्रेसला चांगलं म्हणता, तुम्ही राहुल गांधी यांना भेटता, त्यांना मिठी मारता आणि तुम्ही बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांनाही भेटता.
या गोष्टीवर आम्हाला काही बोलायचं नाही पण तु्म्ही जे सध्या खोटं बोलून प्रचार करत आहात ते चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटले आहे.
तुम्ही कुणाला भेटता, कुणाचा पाठिंबा घेता यावर आम्हाला काय म्हणायचच नाही पण जे तुम्ही खोटं बोलणं चालू केलं आहे ते तात्काळ थांबवा असा सल्लाही त्यांनी या दोघांना दिला आहे.
तर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी अडीच वर्षाच्या कार्यकाळात तुम्ही साधं कुणाला भेटत नव्हता, आणि सत्ता गेल्यावर मात्र रस्त्यावर का आला.
आणि आता तुमच्याकडे बोलायला तुमची माणसंही नाहीत, तुम्ही कुणाला तरी इंपोर्ट करता आणि इतरांवर टीका करायला लावता असा टोला त्यांनी सुषमा अंधारेंनाही लगावला आहे.
त्यामुळे ठाकरे गट आता काय करतो आहे आणि त्यांचे राजकारण काय चालू आहे हे सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना माहिती आहे असंही त्यानी म्हटले आहे.