एकनाथ खडसेंना दिलासा, याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
सुनावणी होईपर्यंत ईडीला त्यांच्याविरोधात काहीही कारवाई करता येणार नाही. (Eknath Khadse hearing on petition adjourned)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 17 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. ईडीने खडसेंविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. मात्र खडसे यांचे वकील इतर कामात व्यस्त असल्याने त्यांनी कोर्टाकडे वेळ मागितला आहे. त्यामुळे खडसेंनी दाखल केलेल्या या याचिकेवर पुढील सुनावणी 17 फेब्रुवारीला होणार आहे. (Eknath Khadse hearing on petition adjourned)
मुंबई हायकोर्टात ही सुनावणी होईपर्यंत खडसे यांना सरंक्षण मिळणार आहे. यावर सुनावणी होईपर्यंत ईडीला त्यांच्याविरोधात काहीही कारवाई करता येणार नाही.
एकनाथ खडसे यांच्या विरोधात ईडीने ECIR दाखल केला आहे. खडसे यांच्या विरोधात पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. मंत्री असताना खडसेंनी कोट्यवधी रुपयांची जमीन लाटल्याचा त्यांच्यावर आरोप झाला होता. याबाबत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास पुणे एसीबीने केला होता. यानंतर तपास झाल्यावर याबाबत गुन्हा घडला असल्याचं आढळून येत नसल्याने एसीबीने क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे.
आता याच प्रकरणाचा ईडीने तपास सुरू केला आहे. याप्रकरणी ईडीने खडसे यांची चौकशीही केली. मात्र, त्यांना चौकशीसाठी पुन्हा यावं लागेल, अस सांगण्यात आलं होतं. यामुळे ईडी आपल्याला अटक करू शकते, असं खडसे यांना वाटल. यामुळे त्यांनी मुंबई हायकोर्टात आपल्या विरोधात ईडीने दाखल केलेला ECIR रद्द करावा या मागणीसाठी याचिका केली आहे. आज त्यावर सुनावणी झाली. ईडीतर्फे अडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी युक्तीवाद केला. (Eknath Khadse hearing on petition adjourned)
साडेसहा तास चौकशी
दरम्यान, 15 जानेवारी रोजी पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी खडसे आणि त्यांच्या कन्येची आज ईडीकडून सुमारे साडे सहातास चौकशी करण्यात आली. ईडीकडून आपल्यावर कोणताही दबाव टाकण्यात आला नाही. ईडीला जेव्हा जेव्हा गरज पडेल, तेव्हा तेव्हा त्यांना सर्व सहकार्य करण्यात येईल, असं खडसे यांनी सांगितलं होतं.
खडसे 15 जानेवारी रोजी सकाळीच ईडीच्या कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांची साडे सहातास कसून चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांच्या कन्येचीही चौकशी करण्यात आली. या चौकशी नंतर संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारे खडसे ईडी कार्यालयातून बाहेर पडले. यावेळी मीडियाने त्यांना गराडा घातला असता खडसे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. ईडी मला जेव्हा जेव्हा कागदपत्रं आणि इतर माहितीसाठी बोलावेल तेव्हा तेव्हा मी हजर राहीन. ईडीला सर्व सहकार्य करणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र, आजच्या चौकशीत काय काय विचारणा करण्यात आली, हे सांगणं त्यांनी टाळलं होतं. (Eknath Khadse hearing on petition adjourned)
संबंधित बातम्या :
खडसेंवरील गुन्हा रद्द होणार?; आज कोर्टात सुनावणी
भोसरी भूखंड प्रकरणात नोटीस, 30 डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर राहणार, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया