राज्यपालांच्या मनात तसं काहीच नसेल, शिवाजी महाराजांबद्दल आदरच, भाजप नेत्याने दिले स्पष्टीकरण…
भाजपने समर्थन केले असं आम्ही कुठंही म्हटले नाही. हिंदी मराठी भाषेमुळे असा घोळ होत असावा असंही त्यांनी बोलताना सांगितले.
मुंबईः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले. त्यानंतर राज्यसरकार आणि राज्यपालांविरोधातही विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला. दोन दिवस उलटत आले तरीही राज्यपालांकडून आणि भाजपकडू कोणतेही स्पष्टीकरण मांडण्यात आले नसल्याने भाजपचे आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपची भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, राज्यपाल यांच्या मनात तसे काही नसेलच, शिवाजी महाराजांबद्दल आदर असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. तर सुधांश त्रिवेदी यांच्या वादग्रस्त वक्तव्यबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी खासदार संजय राऊत यांनी यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, संजय राऊत हे रोज काही तरी मागणी करत असतात असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याबद्दल मत व्यक्त करताना गिरीश महाजन म्हणाले की, भाजपने समर्थन केले असं आम्ही कुठंही म्हटले नाही. हिंदी मराठी भाषेमुळे असा घोळ होत असावा असंही त्यांनी बोलताना सांगितले.
मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावरही निशाणा साधला. त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल ते म्हणाले की, खडसे यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमीट करायला हवं असा टोला त्यांना लगाण्यात आला आहे.
प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, कार्यक्रमाच्यानिमित्ताने अनेकजण एकत्र येतात, तसे आंबेडकर-ठाकरे एकत्र आले असतील. शेवटी राजकारण आहे त्यामुळे काहीही होऊ शकतं असं मत त्यांनी आंबेडकर-ठाकरे भेटीविषयी व्यक्त केले.