शिवरायांचा इतिहास माहीत नसेल तर का बोलता ? लोढांच्या वक्तव्यानंतर भुजबळांनी कान टोचले…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना मंगल प्रभात लोढा म्हणाले की, औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलं होतं पण स्वराज्यासाठी ते बाहेर पडले.
मुंबईः सध्या राज्याच्या राजकारण वेगवेगळ्या मुद्यांनी गाजत आहे. कधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणे, कधी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बोलणे, कधी राज्यपालांनी वादग्रस्त वक्तव्य करणे तर कधी भाजपच्या प्रवक्त्यांनी छत्रपती शिवरायांबद्दल बोलणे असे प्रकार राज्यात चालूच आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करून पुन्हा एकदा राजकारण ढवळून काढले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्य ताजे असतानाच शिंदे गटातील मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून पुन्हा एकदा नव्या वादाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे.
त्यावरूनच राष्ट्रवीदी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांच्या या वक्तव्याबद्दल त्यांनी मत व्यक्त करताना ते म्हणाले की, जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास माहिती नसेल, तर तुम्ही त्यांची तुलना कशाल करता, आणि बोलताच का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
मंगल प्रभात लोढा यांच्यावर टीका करताना त्यांनी छत्रपती शिवजी महाराज यांचा इतिहास सांगत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना मंगल प्रभात लोढा म्हणाले की, औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलं होतं पण स्वराज्यासाठी ते बाहेर पडले.
तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील कुणीतरी डांबून ठेवलं होतं पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले, असं सांगत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांना मिर्झाराजे यांना घेऊन गेले त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना आपल्याला राजासारखी वागणूक मिळत नाही असं ज्यावेळी वाटलं. त्यावेळी शिवाजी महाराज यांनी त्यांचा बोलून अपमान केला. अपमान झाला म्हणून त्यांना अटक झाली.
तरीही छत्रपती शिवाजी महाराज मोघलांच्या तावडीतून बाहेर पडले. आणि या गोष्टीची तुलना तुम्ही एकनाथ शिंदे यांच्याबरोबर करता पण एकनाथ शिंदे हे मंत्रीच होते, त्यांच्याविरोधात इथे कोण मोघल होते असा सवाल आमदार छगन भुजबळ यांनी केला आहे.