tv9 Explainer: 10 पॉईंटसमधून समजून घ्या मंत्री नवाब मलिकांना ईडीने का केलीय अटक? काय आहेत पर्याय?

नवाब मलिक यांना अटक का झाली आहे? आणि नवाब मलिक यांच्यासमोर आता पुढे पर्याय काय आहेत? याबाबतही आपण आढावा घेणार आहोत. मात्र या अटकेने राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली आहे.

tv9 Explainer: 10 पॉईंटसमधून समजून घ्या मंत्री नवाब मलिकांना ईडीने का केलीय अटक? काय आहेत पर्याय?
नवाब मलिक यांच्यापुढे पर्याय काय?
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 5:06 PM

मुंबई : पहाटेपासूनच्या चौकशीनंतर अखेर ईडीने (ED) राष्ट्रवादी नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक केली आहे. त्यानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप पुन्हा आमनेसामने आले आहेत. पण नवाब मलिक यांना अटक का झाली आहे? आणि नवाब मलिक यांच्यासमोर आता पुढे पर्याय काय आहेत? याबाबतही आपण आढावा घेणार आहोत. मात्र या अटकेने राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली आहे. नवाब यांच्यानंतर आणखी मंत्र्यांना अटक होणार असा इशारा भाजपकडून देण्यात आला आहे. तर भाजप हे सर्व महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी करत आहे. असा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. ईडीनं नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देखील माहिती दिली असल्याचं कळतंय. ईडीनं अटक केली असल्यानं नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे.

मलिकांना अटक का? आणि पर्याय काय?

  1. पाहटेपासून ईडीकडून चौकशी– नवाब मलिक यांच्या भल्या पहाटचे ईडीचे अधिकारी पोहोचले. त्यानंतर मलिकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. सकाळपासून त्यांची चौकशी सुरू होती.
  2. कारवाई सुडबुद्धीने – ईडीची ही कारवाई सुडबुद्धीने होत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप आहे. भाजप सरकार पाडण्यासाठी असे प्रयत्न करत असल्याचे महाविकास आघाडीचे नेते सांगत आहेत.
  3. हे होणारच होतं-  शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया यावर अशी आली की हे तर होणारच होतं. मलिक यांना अटक होणार होती हा अंदाज आम्हाला आधीपासून होता. आमच्या मंत्र्यांना टार्गेट केलं जातंय असा आरोप पवारांनी केला.
  4. जमीन खरेदीमुळे अटक – 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन खरेदी केली असल्यानं मलिकांना ईडीकडून 7 तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
  5. अटकेनंतर काय? – मलिक यांच्या अटकेनंतर मेडीकल करून कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यांना ईडी कार्यालयातून बाहेर काढत मेडिकलसाठी नेण्यात आले.
  6. पहिला पर्याय– ईडी कस्टडी मिळाली तर कोर्टात चॅलेंज करता येणार हा मुख्य आणि पहिला पर्याय मलिकांसमोर आहे.
  7. दुसरा पर्याय– न्यायलयीन कस्टडी मिळाली तर कोर्टात जामिनासाठी अर्ज करता येणार आहे.
  8. तिसरा पर्याय– अटक राजकीय असल्याचे पटवून जामिन मिळवता येऊ शकतो. मात्र यात जामीन मिळेल की नाही हे सांगता येत नाही.
  9. राजीनामा देणार?- मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजप नेत्यांनी राजीनाम्यासाठी जोर लावला आहे, सतत भाजप नेत्यांकडून नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
  10. पवार काय निर्णय घेणार- मलिक यांच्या अटकेनंतर शरद पवारांची मुख्यमंत्र्यांसोबत तातडीची बैठक बोलावली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही बैठक बोलावली आहे. त्यानंतर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

हे तीन मुख्य पर्याय

मलिकांचा राजीनामा घेणार?

नवाब मलिक यांची चौकशी सुरू झाल्यापासूनच राज्यात जोरदार पॉलिटीकल राडा सुरू झाला होता. वरील सांगितलेल्या घटनाक्रमाप्रमाण पाहटेपासून या घडामोडी घडत आहेत. आता नवाब मलिक यांचं पुढचं पाऊल काय असणार आहे. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच महाविकास आघाडी नवाब मलिक यांचा राजीनाम घेते का? याकडेही सर्वाचे लक्ष लागलं आहे. मात्र सध्या यावरून राज्यात पुन्हा जोरदार पॉलिटिकल राडा सुरू झाला आहे. एवढं मात्र नक्की. भाजपनेही मलिकांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Nawab Malik Arrested : नवाब मलिक यांना ईडीकडून अटक, लढेंगे और जितेंगे अटकेनंतर पहिली प्रतिक्रिया

मंत्री नवाब मलिकांना ईडीकडून अटक, पुढे काय होणार? उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया…

Nawab Malik Arrest :नाही तर तुझ्या हातात विडी देतील, मलिकांवर नारायण राणेंची खोचक प्रतिक्रिया

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.