मुंबई : पहाटेपासूनच्या चौकशीनंतर अखेर ईडीने (ED) राष्ट्रवादी नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक केली आहे. त्यानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप पुन्हा आमनेसामने आले आहेत. पण नवाब मलिक यांना अटक का झाली आहे? आणि नवाब मलिक यांच्यासमोर आता पुढे पर्याय काय आहेत? याबाबतही आपण आढावा घेणार आहोत. मात्र या अटकेने राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली आहे. नवाब यांच्यानंतर आणखी मंत्र्यांना अटक होणार असा इशारा भाजपकडून देण्यात आला आहे. तर भाजप हे सर्व महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी करत आहे. असा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. ईडीनं नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देखील माहिती दिली असल्याचं कळतंय. ईडीनं अटक केली असल्यानं नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे.
मलिकांना अटक का? आणि पर्याय काय?
हे तीन मुख्य पर्याय
मलिकांचा राजीनामा घेणार?
नवाब मलिक यांची चौकशी सुरू झाल्यापासूनच राज्यात जोरदार पॉलिटीकल राडा सुरू झाला होता. वरील सांगितलेल्या घटनाक्रमाप्रमाण पाहटेपासून या घडामोडी घडत आहेत. आता नवाब मलिक यांचं पुढचं पाऊल काय असणार आहे. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच महाविकास आघाडी नवाब मलिक यांचा राजीनाम घेते का? याकडेही सर्वाचे लक्ष लागलं आहे. मात्र सध्या यावरून राज्यात पुन्हा जोरदार पॉलिटिकल राडा सुरू झाला आहे. एवढं मात्र नक्की. भाजपनेही मलिकांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Nawab Malik Arrested : नवाब मलिक यांना ईडीकडून अटक, लढेंगे और जितेंगे अटकेनंतर पहिली प्रतिक्रिया
मंत्री नवाब मलिकांना ईडीकडून अटक, पुढे काय होणार? उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया…
Nawab Malik Arrest :नाही तर तुझ्या हातात विडी देतील, मलिकांवर नारायण राणेंची खोचक प्रतिक्रिया