…आम्ही एक इंचही जमीन राज्याबाहेर जाऊ देणार नाही, कर्नाटक-महाराष्ट्र वादावरून उद्धव ठाकरेंवर शिंदे गटाची टीका

ज्या गावांवरून त्यांनी दावा सांगितला आहे, ती गावं तर सोडाच पण आम्ही एक इंचही जमीन इतर ठिकाणी सोडणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

...आम्ही एक इंचही जमीन राज्याबाहेर जाऊ देणार नाही, कर्नाटक-महाराष्ट्र वादावरून उद्धव ठाकरेंवर शिंदे गटाची टीका
Follow us
| Updated on: Nov 28, 2022 | 10:34 PM

मुंबईः कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील 40 गावांसह अक्कलकोट, पंढरपूर या गावांवर दावा करुन त्यांनी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून काढले होते. त्यावरून केंद्र सरकारसह राज्य सरकारवरही विरोधकांनी जोरदार टीका केली होती. तर माजाी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा दौऱ्यावर असताना पंढरपूरवर कर्नाटकने दावा सांगितल्यावरून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. त्यावरून आज मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

कोरोना काळानंतर आणि महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर उद्धव ठाकरे आताच बुलढाणा दौऱ्यावर गेले आहेत.

ते दौऱ्यावर असल्यामुळे त्यांना कर्नाटक-महाराष्ट्राविषयीच्या वादाची चुकीची माहिती दिली असल्याचा टोला शंभूराज देसाई यांनी लगावल आहे.

त्यांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील चाळीस गावं, अक्कलकोट, पंढरपूर ही गावं तर सोडाच आम्ही एक इंचही जमीन राज्याबाहेर जाऊ देणार नाही असा विश्वास आणि ठाकरे गटाला टोला त्यांनी लगावला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा दौरा करताना त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून उठलेल्या वादावरून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती. यावेळी त्यांनी राज्यात भाजपबरोबल सत्ता आहे आणि केंद्रातही भाजपची सत्ता आहे.

त्याचबरोबर कर्नाटकचे मुख्यमंत्रीही भाजपचेच मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील गावांवर दावा करण्याचे धाडस त्यांचे होत असल्याची टीका त्यांनी केली होती. त्या टीकेला उत्तर देताना शंभूराज देसाई यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

शंभूराज देसाई यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडू कोणत्याही प्रकारे अशा गोष्टी होणार नाहीत.

त्यामुळे ज्या गावांवरून त्यांनी दावा सांगितला आहे, ती गावं तर सोडाच पण आम्ही एक इंचही जमीन इतर ठिकाणी सोडणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.