“…यांनी हवेत बाण मारणं बंद करावं”; शिंदे गटाच्या नेत्यानं परिणामांची शक्यता सांगितली
चिन्ह आणि पक्ष याच्यावर दावा केला गेला आहे कारण ठाकरे गटाच्या आमदार आणि खासदारांपेक्षा आमच्या गटाचे आमदार आणि खासदारांची संख्या जास्त असल्याचेही त्यांनी सांगितले.

सातारा: शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर राज्यातील राजकारण अनेकांगाने ढवळून निघाले. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेत्यांनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल चढविला आहे. त्यातच आता शाब्दिक चकमकी वाढल्या असून खासदार संजय राऊत यांच्यावर शिंदे गटातील अनेक नेत्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ठाकरे गटाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चोरांनी चोरले असल्याची टीका केली होती. तर न्यायालय हे सत्ताधाऱ्यांच्या खिशात असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केला होता.
संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेवर बोलताना महसूल मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांनी हवेत बाण मारणं बंद करावं असं सांगत त्यांच्या बेताल वक्तव्याबद्दल ठाकरे गट अडचणीत येणारअसल्याचा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला आहे.
महसूल मंत्री शंभूराज देसाई यांनी पक्ष आणि चिन्हाच्या निर्णयावर बोलताना म्हणाले की, या दोन्ही गोष्टी आमच्याच आहेत. त्याचमुळे धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव हे आमचेच आहे हे आम्ही पहिल्या पासून सांगत आलो आहे असे ठामपणे त्यांनी सांगितले.
चिन्ह आणि पक्ष याच्यावर दावा केला गेला आहे कारण ठाकरे गटाच्या आमदार आणि खासदारांपेक्षा आमच्या गटाचे आमदार आणि खासदारांची संख्या जास्त असल्याचेही त्यांनी सांगितले.
चिन्ह आणि पक्ष शिंदे गटाला मिळाल्यानंतर त्यांनी पूर्ण विश्वासाने हा पक्ष आमचाच असल्याचे सांगितले. त्याचवेळी हेही सांगितले की, शिवसेनेच्या जिल्हा कार्यालय, तालुका कार्यालय, शाखा, आहेत त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा सैनिक आता या कार्यालयात काम करणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी चिन्ह आणि पक्ष याचा निर्णय झाल्यानंतर शिंदे गटावर अगदी जोरदार हल्लाबोल केला होता. कुत्र्याची उपमा देत शिंदे गटाला चिन्ह आणि पक्ष मिळाला असला तरी त्याचा काहीही परिणाम ठाकरे गटाला होणार नाही असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, न्यायालय हे सत्ताधाऱ्यांच्या खिशात आहे यावर आता शिंदे गटाने आक्षेप घेतला आहे. त्यांनी असे वक्तव्या केल्यामुळे आपण आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले. त्यामुळे संजय राऊत आणि ठाकरे गटाने हवेत बाण मारणं बंद करावे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
खासदरा संजय राऊत यांनी न्यायालय हे सत्ताधाऱ्यांच्या खिशात आहे या वक्तव्यावर शंभूराज देसाई यांनी आक्षेप घेत, या नेत्यांच्या वक्तव्यामुळे ठाकरे गट अडचणीत येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.