“संजय राऊत खासदारकीचा राजीनामा द्या आणि निवडून येऊन दाखवा”; शिंदे गटाचा राऊतांवर हल्लाबोल…

शंभूराज देसाई यांनी टीका करताना संजय राऊत आता पुन्हा कधी खासदार होणार नाहीत, कारण ते आमच्या जीवावर खासदार झाले आहेत. त्यामुळे त्यांनी बोलताना आता तोंड सांभाळून बोलावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.

संजय राऊत खासदारकीचा राजीनामा द्या आणि निवडून येऊन दाखवा; शिंदे गटाचा राऊतांवर हल्लाबोल...
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 8:42 PM

साताराः महाविकास आघाडी आणि शिंदे गट सध्या एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. त्यातच खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे आता शिंदे गटाने संजय राऊत यांच्यावर चहूबाजूंनी टीकेचा भडिमार केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्रावर टीका केल्याने शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा आणि हिम्मत असेल तर पुन्हा निवडून येऊन दाखवावे असे थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे हा वाद प्रचंड वाढला असल्याचे दिसून येत आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. मात्र ते पुढच्यावेळी निवडून येणार नाहीत असा जोरदार हल्लाबोल केला आहे.

तर शंभुराज देसाई यांनी आक्रमक उत्तर देत आमच्या जीवावर तुम्ही खासदार झाला आहात. आता यावेळी त्या खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीत निवडूण येऊन दाखवा असं आव्हान संजय राऊत यांना देण्यात आले आहे.

श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करण्यात आल्यानंतर शिंदे गटाने चहूबाजूंनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शंभूराज देसाई यांनी टीका करताना संजय राऊत आता पुन्हा कधी खासदार होणार नाहीत, कारण ते आमच्या जीवावर खासदार झाले आहेत. त्यामुळे त्यांनी बोलताना आता तोंड सांभाळून बोलावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका लागल्यापासून शिंदे आणि ठाकरे गटाच्या शाब्दिक चकमकी वाढल्या आहेत. तर दुसरीकडे आता थोड्याच दिवसात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण आता तंग बनले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.