“मुंबईला कोंबडीची उपमा देणं उचित नाही”;भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार
मुंबईच्या विकासाबद्दल आणि कोणत्याही प्रकल्पाबद्दल उद्धव ठाकरे यांनी बोलू नये अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून मुंबई ही शिवसेनेच्या हातात आहे.
मुंबईः बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या तैलचित्र विधान भवनात लावण्यावरून पेटलेल्या राजकारणावरून आता मुंबईच्या वेगवेगळ्या विषयावरुन राजकारण तापले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. आणि तिला भाजप तिला भीकेला लावणार असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला होता. त्यावरून भाजपने राजकारण सुरू केले आहे.
मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणणे चुकीचे असल्याचे सांगत भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवर मुंबईवर बोलण्याचा आणि त्यांनी आमच्यावर टीका करण्याचा अधिकार गमवल्याची टीका करण्यात आली आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी बोलताना म्हणाले की, मुंबईला कोंबडीची उपमा देणे उचित नाही असा टोला सुधीर मुनगटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
मुंबईच्या विकासाबद्दल आणि कोणत्याही प्रकल्पाबद्दल उद्धव ठाकरे यांनी बोलू नये अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून मुंबई ही शिवसेनेच्या हातात आहे.
त्यावरून आता राजकारण तापले आहे. महानगरपालिकेची निवडणुकी जवळ येत असल्याने आमच्या टीका केली जात असल्याचे ठाकरे गटाचे मत आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे गटाच्या कार्यशैलीवर टीका करत त्यांनी मुंबई महानगरपालिकेचा कारभारावरही जोरदार हल्लाबोल केला. गेल्या 20 वर्षापासून सत्तेत असलेल्या शिवसेनेने मुंबईचे रस्त्ये खड्ढेमय केले आहेत.
चांगल्या सोयीसुविधा नसल्यामुळे 65 टक्के मुंबईमध्ये येणारे प्रकल्प फक्त सुविधा नसल्यामुळे 24 तासात परत जातात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुंबईवर बोलण्याचा अधिकार गमावला आहे अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.