MH CET Exam: विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; सीईटी परीक्षेत महत्त्वाचे बदल

दरम्यान JEE , NEET आणि MHT CET या परीक्षांच्या तारखांमध्ये घोळ होऊ नये म्हणून परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ही परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

MH CET Exam: विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; सीईटी परीक्षेत महत्त्वाचे बदल
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 11:00 PM

मुंबई: महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा MHT CET 2022 ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी ट्विट करून माहिती दिली होती. उच्च आणि तंत्रशिक्षण मंडळाकडून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र सीईटी परीक्षेत (CET Exam) काही महत्त्वाचे बदल राज्य शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहेत. उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. पुढच्या वर्षीपासून सीइटीचा निकाल 1 जुलै रोजी लागणार आहे. 1 सप्टेंबर पासून सत्र सुरू होईल अशा प्रकारचे नियोजन असल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

ज्या विद्यार्थ्यांना आपले गुण कमी वाटतील अशा विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या परीक्षांप्रमाणेच पुन्हा परीक्षा घेऊन अधिक गुण मिळवण्याची संधी देण्यात येणार असल्याचीही घोषणा यावेळी त्यांनी केली आहे.

एकूण गुणांवर पदवी कार्यक्रमाला प्रवेश

तसेच या संदर्भातील मोठा बदल म्हणजे आतापर्यंत विद्यार्थ्यांना पदवीच्या शिक्षणासाठी CET गुणांवर प्रवेश देण्यात येत होता. मात्र आता बारावीचे 50 टक्के आणि CET चे 50 टक्के अशा एकूण गुणांवर पदवी कार्यक्रमाला प्रवेश देण्यात येणार आहे. यामुळे बारावीच्या गुणांचे महत्वं नक्कीच वाढणार असल्याचे उच्च शिक्षणमंत्र्यांनी यांनी सांगितले आहे.

सर्व प्रकारच्या प्रवेशांना हा नियम लागू

ज्या विद्यार्थ्यांना CET परीक्षा देऊन कोणत्याही प्रकारच्या पदवी कार्यक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना आणि सीईटीद्वारे होणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवेशांना हा नियम लागू होणार आहे. या परीक्षेच्या तारखा एमएचटी सीईटी परीक्षा 2022 साठी PCM ग्रुपची परीक्षा येणाऱ्या 05 ते 11 ऑगस्ट, 2022 या दरम्यान घेण्यात येणार आहे. तर PCB ग्रुपची परीक्षा ही 12 ते 20 ऑगस्ट, 2022 दरम्यान होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

या तारखांना कोणतेही पेपर नसणार

तर 15, 16 व 17 ऑगस्ट या तारखांना कोणतेही पेपर नसणार आहेत. दरम्यान JEE , NEET आणि MHT CET या परीक्षांच्या तारखांमध्ये घोळ होऊ नये म्हणून परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ही परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.