दिव्यांगासाठी मोठी बातमी..!; ‘या’ निर्णयाचे राज्य आणि देशही करणार अनुकरण…

दिव्यांग कल्याण विभागाने अनोख्या पद्धतीचा हा उपक्रम राबवल्याने या योजनेचा “इतर राज्य आणि देशही दिव्यांग मंत्रालयाचे अनुकरण करणार” त्यामुळे दिव्यांग विभागाचे कौतूक केले जात आहे.

दिव्यांगासाठी मोठी बातमी..!; 'या' निर्णयाचे राज्य आणि देशही करणार अनुकरण...
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 7:22 PM

मुंबई : दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालयाची आग्रही मागणी करणारे आमदार बच्चू कडू यांच्यासह राज्यातील दिव्यांगासाठी आता सरकारने एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्षही आता आमदार बच्चू कडू असणार आहे. त्यामुळे आता दिव्यांगासाठी नव्या योजना आता काय काय राबवल्या जाणार आहेत याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या दिव्यांग कल्याण विभागाचा राज्यातील 30 लाखांपेक्षा जास्त दिव्यांगांकरिता खूष खबर असणार आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात या दिव्यांग कल्याण विभागाचे काम झाल्यानंतर दिव्यांगासाठी नेमक्या कोणत्या योजना राबवल्या जाणार आहेत त्याकडेही लक्ष लागून राहिले आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने दिव्यांगासाठी मोठी घोषणा केली असून आता दिव्यांग मंत्रालयच येणार तुमच्या दारी अशी घोषणा करण्यात आली आहे.

या दिव्यांग कल्याण विभागाच्या अभियानाचाही भव्य शुभारंभ होणार असून मुंबईपासून या भव्य अभियानाची सुरुवात होणार आहे.

राज्यातील दिव्यांगासाठी आणि त्यांच्या विकासासाठी आता वेगवेगळे प्रयोग राबवले जातील, आणि त्याचा फायदा दिव्यांगाच्या विकासासाठी होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. दिव्यांग मंत्रालय येणार तुमच्या दारी या योजनेचा शुभारंभही बीकेसी येथील शिवराज्यभिषेकादिवशी होणार आहे.

या योजनेचा शुभारंभ मुख्य्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून दिव्यांग मंत्रालय प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहे. त्यामुळे याचा फायदा जिल्हा, तालुका आणि गावा गावातील दिव्यांगाना होणार आहे.

या योजनेनिमित्त राज्यातील दिव्यांगाची परिस्थिती काय आहे, त्यांना कोण कोणत्या प्रकारच्या अडीअडचणी आहेत त्याकडेही लक्ष दिले जाणार आहे.

दिव्यांग कल्याण विभागाने अनोख्या पद्धतीचा हा उपक्रम राबवल्याने या योजनेचा “इतर राज्य आणि देशही दिव्यांग मंत्रालयाचे अनुकरण करणार” त्यामुळे दिव्यांग विभागाचे कौतूक केले जात आहे.

दिव्यांगाच्या नोकरी, व्यवसाय आणि इतर समस्या दिव्यांग मंत्रालय घरोघरी जावून सोडवणार आहेत. त्याचबरोबर एका वर्षभरात तयार करणार दिव्यांग विकास पॅालिसी असंही त्यांनी यावेळी सांगितले.

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.