मंत्रालयावरील तिरंगा झेंडा अर्ध्यावर उतरवला

| Updated on: Jan 13, 2020 | 6:14 PM

देशभरात राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्याने मंत्रालयावरील तिरंगा झेडा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे (Ministry take National Flag down).

मंत्रालयावरील तिरंगा झेंडा अर्ध्यावर उतरवला
Follow us on

मुंबई : देशभरात राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्याने मंत्रालयावरील तिरंगा झेंडा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे (Ministry take National Flag down). राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर हा पहिलाच प्रसंग आहे. ओमानचे सुलतान “कबूस बिन सईद अल सय्यद” यांचं निधन झाल्यानं त्यांच्या स्मरणार्थ भारत सरकारनं आजच्या दिवशी (13 जानेवारी) राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला (Ministry take National Flag down). त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने देखील मंत्रालयावरील तिरंगा अर्ध्यावर घेतला.

सुलतान काबूस बिन सईद अल सईद यांचं शुक्रवारी (10 जानेवारी) निधन झालं होतं. त्यानंतर भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ एक दिवस राष्ट्रीय दुखवटा पाळण्याची घोषणा केली. राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्यानंतर भारतीय राष्ट्रध्वज अर्ध्यावर घेण्यासोबतच सर्व मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले.

काबूस माजी राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांचे विद्यार्थी

सुलतान काबूस यांनी भारतात आणि तेही पुण्यातच शिक्षण घेतलं. माजी राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा हे त्यांचे शिक्षक होते. इतकंच नाही, काबूस यांच्या वडिलांनी देखील अजमेर येथील मेयो महाविद्यालयात शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी काबूस यांनाही पुण्यात शिकण्यासाठी पाठवलं.

“सुलतान काबूस यांनी भारतासोबत चांगले संबंध तयार केले”

सुलतान काबूस यांनी त्यांच्या कार्यकाळात ओमान आणि भारताचे संबंध अधिक दृढ होण्यावर अधिक भर दिला. मागील काही दशकांमध्ये भारतासोबत त्यांनी राजकीय आणि व्यापारी संबंध अधिक घट्ट करण्यावर जोर दिला. त्यांच्याच कार्यकाळात दोन्ही देशांनी दिल्ली-मस्कट मॅरीटाईम ट्रान्सपोर्ट अॅग्रीमेंट केलं.

ओमानमध्ये 7.7 लाख भारतीय

ओमानमध्ये 7.7 लाख भारतीय नागरिक राहतात. यात 6.55 लाख कामगार आणि इतर नोकऱ्या करणारे आहेत. ओमानमध्ये काही भारतीय कुटुंबं मागील 150-200 वर्षांपासून राहतात. ओमानमध्ये हजारोंच्या संख्येने भारतीय डॉक्टर, इंजिनिअर, चार्टर्ड अकाउन्टंट, शिक्षक, प्राध्यापक, नर्सेस आणि मॅनेजर आहेत.


पंतप्रधान मोदी यांनी काबूस अरब देशांसाठी आणि जगासाठी शांतीचं प्रतिक असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “सुलतान काबूस एक दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांनी ओमानला एक आधुनिक आणि समृद्ध राष्ट्र म्हणून पुढे आणलं. काबूस भारताचे खरे मित्र होते. त्यांनी दोन्ही दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत केले.”