रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरीतील खेडमधील गोळीबार मैदानावरील सभेनंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रामदास कदम यांनी सभा घेतली. या सभेतून जशास तसे उत्तर देत शिवसेनेने ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. मी काम करणारा मुख्यमंत्री आहे घरात बसून फक्त आदेश देणाराच मुख्यमंत्री नाही अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. तर रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांना याच मातीत गाडणार असल्याचे सांगत रामदास कदम यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर थेट आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यासह योगेश कदम यांच्यावरही जोरादर हल्लाबोल केला.
आमदार भास्करराव जाधव यांनी शिवसेनेवर टीका करताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच त्यांनी रामदास कदम यांच्यावरही सडकून टीका केली.
रामदास कदम यांच्या सभेविषयी बोलताना भास्करराव जाधव म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यासाठीच ही सभा शिवसेनेने घेतली असल्याचा टोलाही त्यांनी रामदास कदम यांनी लगावाल आहे.
रामदास कदम यांच्यावर टीका करताना भास्करराव जाधव म्हणाले की,परीक्षेला बसल्यानंतर जर परीक्षेचा पेपर फुटला आणि तो जर फुटीर गटाच्या हातामध्ये आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेली कॉफी म्हणजे ते खरे हुशार विद्यार्थी नव्हे असा टोलाही त्यांनी त्यावेळी शिवसेनेला लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जरी गोळीबार मैदानावर विराट गर्दीत शिंदे गटाने ही सभा घेतली. मात्र आमच्या सभेच्या तोडीस तोड सभा घेण्याचा प्रयत्न या सभेतून केला असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
या सभेचे आणि परीक्षेत कॉफी करणाऱ्या विद्यार्थ्यांची तुलनाही भास्करराव जाधव यांनी शिवसेनेच्या नेत्यांची केली आहे. परीक्षेत फुटलेला पेपरसुद्धा यांना लिहिता आलेला नाही, इतके हे ढ विद्यार्थी असल्याची टीकाही भास्करराव जाधव यांनी केली आहे.
रामदास कदम म्हणजे विझणारा दिवा त्याला जास्त फडफड करावी लागते अशी बोचरी टीकाही भास्करराव जाधव यांनी त्यांच्यावर केली आहे.
रामदास कदम जे टीव्हीवर बोलत असतात त्यापेक्षा वेगळा विचार या सभेतून दिले गेले नाहीत असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.त्यामुळे बाप तसा बेटा, जे बाप बोलतो तेच बेटा बोलणार अशी टीकाही योगेश कदम यांच्यावर त्यांनी केली आहे.
रामदास कदम यांचा सातत्याने गद्दारीचा इतिहास राहिलेला आहे. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांना तत्व शिकवण्याची गरज नसल्याचाही टोला त्यांनी लगावला आहे.