बाळासाहेबांची विचारधारा, गर्व से कहो हम हिंदू है..; तर उद्धव ठाकरे मात्र त्यापासून लांब, या नेत्याची टीका
उद्वव ठाकरे हिंदुत्वापासून दुर गेले आहेत. यावेळी बाळासाहेब ठाकरे असते तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांनी स्वीकारलं नसते असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
मुंबईः राज्यातील राजकारणात ठाकरे-शिंदे गट अशी फूट पडल्यानंतर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. त्यातच सध्या वेगवेगळ्या मुद्यांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप झाल्याने राज्यातील राजकारण आणखी तापले आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्यावरुन शिवसेनेवर भाजपकडून टीका करण्यात येत होती.
त्यानंतर आता शिंदे गट बाहेर पडल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले जात होते.
तर आता मात्र आमदार दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या चर्चेला आता उधाण आले आहे.
उद्वव ठाकरे हिंदुत्वापासून दुर गेले आहेत. यावेळी बाळासाहेब ठाकरे असते तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांनी स्वीकारलं नसते असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
हे सांगत असताना ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा ही गर्व से कहो हम हिंदू है अशी होती. त्यामुळेच ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेली नसते असंही त्यांनी स्पष्ट केले.
दीपक केसरकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेविषयी बोलताना सांगितले की, जी विचारधारा बाळासाहेबांशी जूळत नव्हती. त्यापासून आधी त्यांनी लांब जायला पाहिजे. त्यामुळे गेलेली माणसं पुन्हा परत यायला वेळ लागणार नाही असं मतही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी दीपक केसरकर यांनी ठाकरे गटावर निशाणा साधताना ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्यासोबत जी आता पक्षात राहिलेली माणसं आहेत, ती वैयक्तिक प्रेमापोटी थांबली असल्याची टीका दीपक केसरकर यांनी केली आहे. त्यामुळे जे पक्षात थांबले आहेत ती त्यांची विचारधाराच नव्हे अशी टीकाही त्यांनी केली.
शिवसेना पक्ष हा बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केला होता, आणि त्यांच्या विचारांवरच चालणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या घटनेला दुसरं उत्तर असू शकतं नाही असंही त्यांनी स्पष्ट केले. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आजच्या ठाकरे गटाच्या याचिकेवर दीपक केसरकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.