‘माझ्या जावायाला दीड वर्ष तुरुंगात टाकलं, गिरीश महाजन यांनी कारस्थान रचलं’, विधान भवन परिसरात खडसे कडाडले

गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केले होते, मात्र गिरीश महाजन यांच्या मध्यस्तीनेच माझ्या मागे ईडी लावण्यात आली होती असंही एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितले.

'माझ्या जावायाला दीड वर्ष तुरुंगात टाकलं, गिरीश महाजन यांनी कारस्थान रचलं', विधान भवन परिसरात खडसे कडाडले
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 9:19 PM

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता महाजन आणि खडसे वाद ऐन अधिवेशनात उफाळून आला असल्याने आता हे राजकारण अधिक चिघळले आहे. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या मोक्का कायदा लावण्यात येणार होता असा त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांचा हात असल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला होता. तर आता गौण खनिज प्रकरणी चौकशी लावल्याप्रकरणी आता आमदार एकनाथ खडसे यांनी हे प्रकरण थंड असताना मध्येच का उफाळू आले. त्याला आता गिरीश महाजन हेच कारणीभूत असल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला आहे.

मात्र या गौण खनिज प्रकरणात मी निर्दोष असून त्याबाबत कोणत्याही चौकशी मी सामोरे जाण्यास तयार असल्याचे स्पष्टीकरणही आमदार एकनाथ खडसे यांनी दिले आहे.

यावेळी बोलताना आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, ज्या प्रकारे गिरीश महाजन आरोप करत आहेत. त्याच प्रमाणे त्यांनीही माझ्या जावयची चौकशी लावून त्यांना दीड वर्षे तुरुंगात टाकण्याचे काम यांनीचे केले असल्याचा गंभीर आरोपही गिरीश महाजन यांनी केला आहे.

यावेळी एकनाथ खडसे यांनी सांगितले की, मुक्ताईनगरच्या माझ्या परिवाराच्या जमिनीसंदर्भात एक प्रकरण मांडण्यात आले होते.

तेथील गौण खनिज हे नॅशनल हायवे अॅथोरेटाला मी विकले आहे असा आरोप त्यामध्ये करण्यात आला होता. मात्र वास्तविक पाहता तशा प्रकारची गौण खनिजची जमीन कोणालाही विकण्यात आली नाही हे त्यातील खरं तथ्य होते. मात्र ती जमीन मोफतच त्या ठिकाणी देण्यात आले आहे.

नॅशनल हायवे अॅथोरेटीला जी जमिन देण्यात आली होती. त्या गौण खनिजच्या जमिनीमध्ये शेततळे निर्माण करण्याचीही एक तरतूद त्या कायद्यामध्ये असल्याचेही खडसे यांनी यावेळी सागंतिल.

नॅशनल हायवे अॅथोरेटीने गौण खनिज ताब्यात घेतल्या आधीपासूनच गौण खनिजाच्या टेकड्यावर कित्येक त्या ठिकाणी काम चालू होते. त्यातून कधी गौण खनिज काढण्यात आली हे आता नक्की सांगता येणार नाही, मात्र त्याबाबत तक्रार करण्यात आली आहे.

या गौण खनिजाबाबत या तक्रारीची चौकशी होईलच मात्र आता मध्येच याबाबत तातडीने चौकशी करण्याचे आदेश सरकारने काढलेले आहेत.

मात्र हे प्रकरण आताच का बाहेर काढण्यात आले आहे ते अजून स्पष्ट झाले नाही. मात्र या प्रकरणाची चौकशी लागल्यानंतर या प्रकरणाचे तथ्य बाहेर येईल त्यावेळी सत्य बाहेर येईल असंही त्यांनी यावेळी सांगितले.

मा्त्र आता मला असं वाटतं आहे की, या प्रकरणात नाथाभाऊला अडकवण्यासाठी हे प्रकरण बाहेर काढले आहे असं यावरून स्पष्टपणे दिसत आहे.

गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केले होते, मात्र गिरीश महाजन यांच्या मध्यस्तीनेच माझ्या मागे ईडी लावण्यात आली होती असंही एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितले.

वास्तविक त्या भूखंडाशी माझा दुरान्वये संबंध नाही असंही एकनाथ यांनी स्पष्टपण सांगितले आहे. ज्या भूखंडाबाबत तक्रार केली गेली आहे. तो भूखंड खरेदीही केला नाही आणि त्याला पैसेही दिले नाहीत असंही त्यांनी यावेळी सांगितले. तरीही माझ्यामागे ईडी लावण्याचे कटकारस्थान करण्यात आल्याचे चौकशी लावण्यात आली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.