Eknath Shinde: शिवसेनेच्या बंडखोरांसाठी रेड कार्पेट?; ज्या गेटमधून फक्त राष्ट्रपतींना एन्ट्री, तिथूनच शिवसेनेच्या तीन आमदारांचा प्रवेश!

गुवाहाटी विमानतळावर आमदारांना व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात येत आहे, ही ट्रीटमेंट नेमकी कोणाकडून देण्यात येत आहे त्याचीही चर्चा आता राजकीय वर्तुळासह सर्वत्र होताना दिसून येत आहेत.

Eknath Shinde: शिवसेनेच्या बंडखोरांसाठी  रेड कार्पेट?; ज्या गेटमधून फक्त राष्ट्रपतींना एन्ट्री, तिथूनच शिवसेनेच्या तीन आमदारांचा प्रवेश!
बंडखोर आमदारांच्या निलंबनावर सोमवारपासून सुनावणी, आमदारांना व्यक्तीश: हजर रहावं लागणारImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 3:20 PM

मुंबईः राज्यातील विधान परिषदेच्या निकालानंतर (Vidhan Parishad Elction Result 2022) शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले. मुंबई, सूरत आणि आता गुवाहटी त्यानंतरही एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांचा हा सुपरक्लास प्रवास अजून सुरूच आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ज्या हॉटेलमध्ये बंडखोर आमदार थांबले होते, त्या हॉटेलपासून ते अगदी बंडखोर आमदारांना मिळणारा व्हीआयपी ट्रीटमेंटची (VIP Treatment) चर्चा जोरदापणे सुरू आहे. शिवसेनेच्या बंडखोरांसाठी गुवाहाटी विमानतळ प्राधिकरणाचेही रेड कार्पेटची सोय करण्यात आली आहे.

विशेष लोकांसाठी तयार केलेल्या या गेटमधून फक्त या आमदारांचीच एक्झिट होणार असल्याने त्यांच्या या रेड कार्पेटची चर्चा जोरदारपणे करण्यात येत आहे.

आमदारांसाठी खास सोय

महाराष्ट्रातील आणि महाविकास आघाडीतील ज्या बंडखोर आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटीत थांबले आहेत, त्या हॉटेलमध्ये या आमदारांसाठी खास सोय तर आहेच पण ते ज्या विमानतळावरून पुढील प्रवास करत आहेत, त्या विमानतळावरील त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधांविषयी चर्चा करण्यात आहे.

 रेड कार्पेटची चर्चा

गुवाहाटीमधील ज्या विमानतळावरून पुढील प्रवास करणार आहेत, ते आमदार विशेष लोकांसाठी तयार केलेल्या गेटमधूनत आमदारांची एक्झिट होत आहेत, त्यामुळे आमदारांच्या या हायफाय सोयीमुळे या आमदारांना मिळणाऱ्या रेड कार्पेटची चर्चेना आता ऊत आला आहे.

आमदारांना व्हीआयपी ट्रीटमेंट

गुवाहाटी विमानतळावर आमदारांना व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात येत आहे, ही ट्रीटमेंट नेमकी कोणाकडून देण्यात येत आहे त्याचीही चर्चा आता राजकीय वर्तुळासह सर्वत्र होताना दिसून येत आहेत.

त्याच गेटमधून एक्झिट

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ज्या व्हीआयपी लोकांची विमानतळावरील गेटमधून ट्रीटमेंट दिली जाते त्याच गेटमधून या आमदारांमधील तीन आमदारांना त्यांतून त्यांना एन्ट्री देण्यात येत आहे.

आमदारांना लाखाची सर्व्हिस

बंडखोरीमुळे आधीच चर्चेत आलेले आमदार आता त्यांना मिळणाऱ्या फाईव्ह स्टार सर्व्हिसमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता विमानतळावरील व्हीआयपी गेटची जोरदार चर्चा या आमदारांमुळे होत आहे. ज्या गेटमधून पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याशिवाय कोणालाच एक्झिट दिल जात नाही, त्या गेटमधून या बंडखोर आमदारांना या वापरू दिले जात आहे.

विमानतळानंतरचा प्रवास नेमका कोणत्या दिशेनं

हॉटेल रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये या बंडखोर आमदार थांबले होते, त्या दिवसांपासून या हॉटेलला छावणीचे स्वरूप आले होते. आज या हॉटेलमधून बंडखोर आमदार एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आदी आमदार हॉटेलमधून बाहेर पडून विमानतळाच्या दिशेने  आले तेव्हा मात्र ते नेमकं मुंबई की दिल्लीला जाणार याबद्दलही अजून काहीही स्पष्ट झाले नाही. त्यामुळे आमदारांची बंडखोरी ज्या प्रमाणे चर्चेत आली आहे त्यापेक्षा अधिक चर्चा आता आमदारांसाठीच्या रेड कार्पेटची चर्चा होऊ लागली आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.