मुंबईः आपल्या राज्यातील महामानव महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असो यांनी आपल्या घरामध्ये आंतरजातीय विवाह केला होता. आणि आंतरजातीय विवाह करण्याचा अधिकार संविधानाने प्रत्येकाला मिळाला आहे. त्यामुळे सरकारने जो नवा नियम सांगितला आहे. तो संविधानविरोधी असल्याची टीका माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. आंतरजातीय विवाहावरून राज्य सरकारवर त्यांनी जातीयवादाचा आरोप करत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्रातील या थोर महामानवांचे विचार पायदळी तुडवण्याचे काम हे सरकार करत असल्याचेही त्यांना म्हटले आहे.
आंतरजातीय, आंतरधर्मिय विवाह करताना एक महिना आधी महिलांच्या आईची परवानगी घ्यायची, त्यांना कळवायचं असे नियम लावून सरकार स्त्रियांचे अधिकारांवर लगाम लावण्याचे काम करत असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.
श्रद्धा वालकर प्रकरणावरून हे पत्रक काढले असले तरी यामागे जातीय मानसिकता घट्ट करण्याचा प्रयत्नही या सरकारकडून चालू असल्याचेही त्यांनी सांगितले.
आंतरजातीय विवाहावर जो निर्बंध आणण्याचा जो काही प्रयत्न केला जात आहे, त्यातून सरकार जातव्यवस्था घट्ट करण्याचाही प्रयत्न या सरकारकडून केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
तर भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देव देवतांवर बोलणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिली आहे. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी टीका करताना म्हणाले की, तुम्ही कायदे नियम करा आणि सगळ्या महाराष्ट्राला जेलमध्ये टाका तुम्हीच फक्त मंत्री बाहेर राहा असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या ट्विटनंतर जी जाळपोळ झाली. त्यानंतरही बोमई जर हे ट्विट मी केले नाही, माझे ट्विटर हँडल हॅक झाले आहे असं ते सांगत असतील तर ते महाराष्ट्रातील जनतेला ते मूर्ख समजत आहेत. आणि त्याला आपले मुख्यमंत्री लगंडे समर्थन करत आहेत अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.