कायद्याचं महत्त्व; जपान दौऱ्यानंतर नरहर झिरवळ यांनी नेमकं ते सांगितलं…

 सिग्नल कोणताही असो तिथं वाहनांची गर्दी नसली, रेड सिग्नल पडला असला तरीही एकही वाहन सिग्नल तोडून कोणी पुढं जाणार नाही. ही तेथील लोकांची शिस्त असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले आहे.

कायद्याचं महत्त्व; जपान दौऱ्यानंतर नरहर झिरवळ यांनी नेमकं ते सांगितलं...
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 7:09 PM

मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहर झिरवळ आणि त्यांच्या पत्नीचा पारंपरिक पेहराव असलेला विमानतळावरचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. तो फोटो व्हायरल झाल्यानंतर नरहर झिरवळ आता पुन्हा भारतात परतले आहेत. जपान दौऱ्यावरून आल्यानंतर कायदा आणि जपान नेमका कसा आहे. हे त्यांनी त्यांच्या साध्यासुध्या भाषेत सांगितले आहे. हे सांगताना त्यांनी भारतीयांच्या आणि जपानच्या नागरिकांच्या मानसिकता काय आहे तेही त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. कायदा नावाची गोष्ट कशी पाळायची असते आणि स्वतःमध्ये ती शिस्त लावून घेतली तर त्याचा देशाला किती फायदा होता. वयोवृद्ध माणसांनाही त्याचा काय फायदा होता हे नरहर झिरवळ यांनी आपल्या शब्दात सांगितले आहे.

आमदार नरहर झिरवळ यांचा सर्वपक्षीय आमदारांबरोबर झालेल्या जपान दौऱ्याबद्दल ते सांगताना त्यांनी आपल्या पेहरावाबद्दलही जाणीवपूर्वक सांगितले.

यावेळी ते म्हणाले ज्यावेळी दौरा ठरला, त्यावेळी लोकप्रतिनिधींचा आणि दौऱ्यावर असलेल्या लोकांचा नेमका काय पेहराव असणार आहे याविषयी चर्चा झाली.

त्याच वेळी नरहर झिरवळ यांना काहींनी पेहराव बदलण्याची कल्पना सुचवली मात्र त्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, माझी ही टोपी माझ्यासोबतच असणार आहे. ती बदलता येणार नाही. जर ती बदला असं कुणी म्हणत असेल तर माझा दौरा रद्द आहे असं समजा असंही त्यांनी यावेळी सांगतिले.

या दौऱ्याविषयी त्यांनी आपल्या पत्नीलाही घेऊन ते गेले होते. त्यावर बोलताना आणि झिरवळ दांपत्याने आपल्या पेहराव कसा आला आहे. आणि त्याविषयी त्यांची त्याविषयी निष्ठा कशी आहे हेही त्यांच्या पत्नीने सांगितले.

त्याचा किस्सा सांगताना ते म्हणतात की, मी शेतातून इथपर्यंत आले आहे. त्यामुळे माझा पेहराव माझी साडी हीच असणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

नरहर झिरवळ यांनी जपान दौऱ्याचं महत्व सांगतान त्यांनी कायद्याचं महत्वही सांगितलं. त्यांनी सांगितले की, जपानमधील दौऱ्यामध्ये एक गोष्ट समजली की, तेथील लोकांनी स्वतःला शिस्त लावून घेतली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी साध्या साध्या गोष्टीतही कायद्याचं महत्वं जाणवतं.

सिग्नल कोणताही असो तिथं वाहनांची गर्दी नसली, रेड सिग्नल पडला असला तरीही एकही वाहन सिग्नल तोडून कोणी पुढं जाणार नाही. ही तेथील लोकांची शिस्त असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.