MLA Portfolio Announcement | सहकार राष्ट्रवादीकडेच गेलं पण अतिमहत्त्वाचं आलं खातं, भाजपने मराठवाड्यातील नेत्याकडे सोपवली मोठी जबाबदारी
शिंदे गटातील आमदारांनाकडून ही खाती काढून घेण्यात आली आहेत. मात्र भाजपच्या एका नेत्याची चांदी झालेली पाहायला मिळत आहे.
मुंबई : राष्ट्रवादीमधून बाहेर पडत शिंदे-फडणवीस सरकारसोबत गेलेल्यार अजित पवार गटातील आमदारांचं खातेवाटप करण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना मलईदार आणि अतिमहत्त्वाची मानाली जाणारी खाती मिळाली आहेत. या खात्यांमध्ये अर्थ, कृषी, औषध व प्रशासन ही महत्त्वाची खाती आहेत. शिंदे गटातील आमदारांनाकडून ही खाती काढून घेण्यात आली आहेत. मात्र भाजपच्या एका नेत्याची चांदी झालेली पाहायला मिळत आहे.
भाजपचे आमदार अतुल सावे यांच्याकडील सहकार खातं काढून घेण्यात आलं आहे. अतुल सावे यांचं हे खातं राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आलं आहे. अतुल सावे यांच्याकडून हे खातं काढून घेण्यात आलं असलं तरी मराठवाड्यातील नेत्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या वरिष्ठांनी दुसरी मोठी जबाबदारी दिली आहे.
अतुल सावे यांच्याकडून हे खातं काढल्यावर त्यांच्याकडे गृहनिर्माण आणि ओबीसी कल्याण खातं देण्यात आलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2019 साली सहकार खात्याचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आला होता. तेव्हाही या खात्याची जबाबदारी अतुल सावे यांच्याकडेच होतं. मात्र आता राष्ट्रवादीमधील ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आलं आहे
राष्ट्रवादीसाठी सहकार खातं महत्त्वाचं आहे कारण पश्चि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साखर कारखाने असून शेतकऱ्यांची नाळसुद्धा कारखान्यांशी जोडलेली असते. राष्ट्रवादी पक्षाचा बेस हा, सहकार आहे त्यामुळे त्यांच्यासाठी हे खातं अतिमहत्त्वाचं आहे. राष्ट्रवादीमधील सर्वच नेते या चळवळीमध्ये होते त्यातील दिलीप वळसे-पाटील हे सुद्धा सहकार चळवळीमध्ये सहभागी होते.
राष्ट्रवादीमध्ये कोणाला कोणतं खातं?
अजित पवार – अर्थ, नियोजन, छगन भुजबळ – अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, धर्मरावबाबा अत्राम – औषध व प्रशासन, दिलीप वळसे पाटील- सहकार, धनंजय मुंडे – कृषी, हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण, अनिल पाटील- मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, आदिती तटकरे- महिला आणि बालकल्याण आणि संजय बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे