Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pratap Sarnaik | प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात हजर राहणार

या आदेशानंतर आता प्रताप सरनाईक आणि विहंग ईडीसमोर हजर होणार आहेत.  (MLA Pratap Sarnaik Will Appears In ED office)

Pratap Sarnaik | प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात हजर राहणार
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 3:15 PM

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण मिळाल्यानंतर आता ते ईडी कार्यालयासमोर हजर होणार आहे. प्रताप सरनाईकांसह मुलगा विहंग सरनाईक उद्या (10 डिसेंबर) ईडीसमोर हजर होणार आहे. टॉप्स सिक्युरिटी घोटाळ्याबाबत 24 नोव्हेंबर रोजी ईडीने प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. याप्रकरणी त्यांची चौकशी केली जाणार आहे. (MLA Pratap Sarnaik Will Appears In ED office)

मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप सरनाईक आणि विहंग सरनाईक उद्या सकाळी 11 वाजता सक्तवसुली संचालनालय (ED) समोर हजर होणार आहे. याआधी या दोघांनी ईडीने अनेकदा समन्स बजावला आहे. मात्र यानंतरही ते दोघेही ईडीसमोर हजर राहिले नव्हते.

मात्र नुकतंच प्रताप सरनाईक यांनी सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिले आहे. प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांवर कुठलीही कारवाई करु नये, असे आदेश दिले आहेत. ईडी सरनाईक कुटुंबाला चौकशीसाठी बोलवू शकते. मात्र त्यांना अटक करु शकत नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे. या आदेशानंतर आता प्रताप सरनाईक आणि विहंग ईडीसमोर हजर होणार आहेत.

अमित चांदोळेंना तीन दिवसाची कोठडी

टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी 25 नोव्हेंबरला अमित चांदोळे यांची ईडीने कसून चौकशी केली होती. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. 26 नोव्हेंबरला सकाळी ईडीने चांदोळे यांना कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने चांदोळे यांना तीन दिवसाची कोठडी सुनावली आहे. चांदोळे यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील ही अत्यंत महत्त्वाची चौकशी मानली जात चांदोळे यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ईडी पुढील सूत्रे हलवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

ईडीची सरनाईकांच्या घर, कार्यालयावर छापेमारी

दरम्यान, ईडीने 24 नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. ईडीने सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि हॉटेलसह 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी सरनाईक मुंबईत नव्हते. ते भारताबाहेर होते. मात्र, ईडीचे छापे पडल्याचं कळताच ते भारतात आले आणि त्यांनी तडक प्रभादेवीतील ‘सामना’ कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. तब्बल दीड तास या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर बोलताना ईडीने कारवाई का केली? कशासाठी केली? याची काहीच कल्पना नसल्याचं सरनाईक यांनी सांगितलं होतं. (MLA Pratap Sarnaik Will Appears In ED office)

संबंधित बातम्या :

आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंगला ईडीकडून पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता

प्रताप सरनाईकांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.