अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणार का? रवींद्र धंगेकरांनी स्पष्ट सांगितलं, म्हणाले…
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाल सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अशातच यावर पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : काँग्रेस पक्षाला निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे. इतकंच नाहीतर काँग्रेसमधील 12 ते 14 आमदार चव्हाण आपल्यासोबत घेऊन जाणार असल्याचीसुद्धा मोठ्या प्रमाणाता चर्चा होत आहे. अशातच पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले रवींद्र धंगेकर?
अशोक चव्हाण काय बोलतील हे पाहावं लागेल पाहावं लागेल पण चव्हाण घराणं हे काँग्रेसचे मोठ घराण आहे असा निर्णय घ्यायला नव्हता पाहिजे. मी काँग्रेसचा हिरो मी कुठेही जाणार नाही. माझ्यामागे ईडी लावताच येणार नसल्याचं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना धंगेकर यांनी भाडपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्यावर निशणा साधला.
चंद्रशेखर बावनकुळे यांनाच तिकीट मिळणार नाही आधी त्यांनी त्यांचं तिकीट कन्फर्म होऊ द्या मग त्यांच्या पक्षात कोण येणार आहे हे सांगा म्हणावं, असं रवींद्र धंगेकर म्हणाले. टीव्ही9 मराठीसोबत बोलताना रवींद्र धंगेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली
अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया
मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे काम केलं. राजकीय दिशा एक ते दोन दिवसात स्पष्ट करेल. अद्याप भाजपसोबत जाण्याबाबत काहीच ठरवलं नाही. मी कोणत्याही आमदाराला संपर्क साधलेला नसल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.
नाना पटोलेंचा चव्हाणांवर निशाणा
काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचवण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून येत्या 15 तारखेला भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. अशोक चव्हाण यांच्या जाण्याने आता राज्यसभेची गणित बदलली जाणार आहेत.