“…आली तर पूर्ण राष्ट्रवादी भाजपासोबत येईल”; शिवसेनेच्या नेत्यानं आगामी काळातील राजकारणाची शक्यता सांगितल्या

| Updated on: May 04, 2023 | 5:25 PM

महाविकास आघाडीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडी ही आता संपलेली आहे. ही आघाडी आता राहिलेली नाही तरीही याआधी घेतलेल्या सभा या उद्धव ठाकरे गटाने ओढलेल्या सभा होत्या असा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

...आली तर पूर्ण राष्ट्रवादी भाजपासोबत येईल; शिवसेनेच्या नेत्यानं आगामी काळातील राजकारणाची शक्यता सांगितल्या
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राज्यासह देशातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यांच्या निवृत्तीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या नावाचीही जोरदार चर्चेला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे आमदार संजय शिरसाठ यांनी राष्ट्रवादीचे भविष्य सांगत राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहामुळे शरद पवार यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगत शरद पवारांनी घेतलेला हा निर्णय विचारअंती घेतलेला आहे असंही त्यांनी अगदी विश्वासानं सांगितले आहे. यावेळी त्यांनी शरद पवार यांना टोला लगावत म्हणाले की, भाकरी फिरवायची सुरूवात पवारांनी स्वतःपासून केली आहे.

त्यामुळे आता भविष्यात राष्ट्रवादीत प्रचंड मोठे बदल होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी पक्ष हा आता भाजपसोबत येणार असल्याचे सांगत त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस आता आली तर पूर्ण राष्ट्रवादी भाजपासोबत येईल त्यातील एखादा गट येईल असं वाटतं नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

त्यामुळे आमच्या विचारांशी राष्ट्रवादीनं जुळवण घेतलं तर आम्ही स्वागतच करू असा विश्वासही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे.

आमदार संजय शिरसाठ यांनी ज्या प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे भविष्य कथन केले आहे, त्याच प्रमाणे त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत हे पक्ष तोडण्यासाठी काम करत असतात. संजय राऊत यांनी ज्या प्रमाणे सरकारी यंत्रणांचे दबाव निर्माण करुन ज्या प्रमाणे राजकारण केले तसं राजकारण चालत नसतं असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

शिवसेना पक्ष खरं तर संजय राऊतांनी संपवला असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. त्याच प्रमाणे संजय राऊत यांनी राष्ट्रवादी संपवण्याचाही प्रयत्न त्यांनीच केला असल्याचा ठपकाही त्यांनी त्यांच्यावर ठेवला आहे.

त्यामुळे आता संजय राऊतांनी आपला पक्ष बघावा, दुसऱ्याचं वाकून पाहण्याची संजय राऊतांना सवय असल्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर ही वेळ आली आहे असा आरोपही त्यांच्यावर त्यांनी ठेवला आहे.

राष्ट्रवादी पक्षाबाबत आता उद्धव ठाकरे यांनी योग्य भूमिका सल्ला कशाला द्यायचा आहे. राष्ट्रवादी पक्ष फूट नये असं आम्हालाही वाटतं.

आता राष्ट्रवादीचे चित्र वेगळं असल्यामुळे संजय राऊतांनी एक दिवसं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जोड्यानं मारतील असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

राष्ट्रवादी पक्षात जोरदार हालचाली चालू झाल्यानंतर कालच्या बैठकीच्या आंमत्रणावरून आमदार जयंत पाटील यांनी नाराजीचा सूर लावला होता.

त्याविषयी बोलताना संजय शिरसाठ म्हणाले की, जयंत पाटील आणि अजित पवार मोठे नेते आहेत. त्यामुळे अंतर्गत प्रश्नावर आपल्यासारख्या लोकांनी काही बोलणं योग्या नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

महाविकास आघाडीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडी ही आता संपलेली आहे. ही आघाडी आता राहिलेली नाही तरीही याआधी घेतलेल्या सभा या उद्धव ठाकरे गटाने ओढलेल्या सभा होत्या असा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.