‘….पुढच्या वेळी असं झालं तर, महाराष्ट्र पेटून उठेल’, सरळ-सरळ भाजपला इशारा, कुणी आणि का दिला..?

गुलाबराव पाटील यांनी मंत्री पद गेलं तरी चालेल पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कोणतीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते.

'….पुढच्या वेळी असं झालं तर, महाराष्ट्र पेटून उठेल', सरळ-सरळ भाजपला इशारा, कुणी आणि का दिला..?
Follow us
| Updated on: Dec 12, 2022 | 10:33 PM

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून ते अगदी आता मंत्री चंद्रकात पाटील यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. त्यातच आता महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर शाईफेकही झाली होती. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केल्या प्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान यांच्याकडे पत्र लिहून स्पष्टीकरण देत अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता असं त्यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर शिंदे गटाच्या आमदार संजय शिरसाठ यांनी त्यांना आता माफी मागितली असली तरी पुढच्या वेळी अशी चूक झाली तर महाराष्ट्र पेटून उठेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर मित्र पक्षासह विरोधकांनीही त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढविला होता.

त्यावेळी गुलाबराव पाटील यांनी मंत्री पद गेलं तरी चालेल पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कोणतीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर संजय गायकवाड यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता.

त्या घटनेची आठवण करून देत संजय शिरसाठ यांनी थेट पुन्हा अशी चूक झाली तर महाराष्ट्र पुन्हा पेटून उठेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही तुमच्यावर असेल असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यपाल यांच्या पत्रावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आताही त्यांनी थेट असा इशाराच दिला आहे.

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना सांगितले की, शिवाजी महाराज यांच्याबद्दल आम्ही कोणतीही गोष्ट ऐकून घेणार नाही.

त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आता माफी मागितली तरी यापुढे राज्यपाल असो की आणखी कोणताही राजकीय नेता असो शिवरायांबद्दल कोणतीही गोष्ट ऐकून घेतली जाणार नाही असा सज्जड दमही भाजपला देण्यात आाल आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.