ट्रान्स हार्बर लिंक रोड मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला जोडण्याचा मानस, किती वेळ वाचणार?

प्रवाशांचा हाच वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी एमएमआरडीएने (MMRDA)एक नवा प्लॅन आखला आहे. यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचणार आहे. या नव्या प्लॅननुसार ट्रान्स हार्बर लिंक रोड (Trance Harbour link Road) मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला जोडण्याासाठी प्रयत्नशील आहे.

ट्रान्स हार्बर लिंक रोड मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला जोडण्याचा मानस, किती वेळ वाचणार?
मुंबई-पुणे प्रवास आणखी वेगवान होणार
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 6:18 PM

मुंबई : सध्या मुंबई ते नवी मुंबई मार्गावरील ट्रॅफिकमुळे (Traffic) मुंबईहून पुण्याला जाताना एक्स्प्रेस (Mumbai Pune Express way) वेपर्यंत पोहचण्यास बराच वेळ जातो. त्यामुळे अनेक प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. शिवाय इंधनाचे दर अव्वाच्या सव्वा वाढल्याने त्याचा वेळेबरोबरच खिशालाही मोठा फटका बसतो. प्रवाशांचा हाच वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी एमएमआरडीएने (MMRDA)एक नवा प्लॅन आखला आहे. यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचणार आहे. या नव्या प्लॅननुसार ट्रान्स हार्बर लिंक रोड (Trance Harbour link Road) मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला जोडण्याासाठी प्रयत्नशील आहे. प्राधिकरण यासाठी एक सल्लागार शोधत आहे. त्यासाठी प्राधिकरणाकडून निविदाही काढण्यात येणार आहेत. याबाबत प्राथमिक अहवालही तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवासांना लवकरच मोठी गूड न्यूज मिळण्याची शक्यता आहे.

किती वेळ वाचणार?

या मार्ग जर या पद्धतीने जोडला गेला तर प्रवाशांना थेट मुंबईतील वरळी ते पुणे असा प्रवास करता येणार असल्याने वेळेची मोठी बचत होणार आहे. असा मार्ग जोडल्यास प्रवाशांचा साधारण एक तासापेक्षा जास्त वेळ वाचेल असा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यासाठी प्राधिकारणाला हजारो कोटींचा खर्च येणार आहे. त्याचाही विचार प्राधिकरण करत आहे. शिवडी ते नवी मुंबईच्या दिशेने या मार्गावार एकवीस किलोमीटर लांबीचा पूल बांधण्यात येणार आहे. सध्या या प्रकल्पाचे काम 65 टक्क्यांच्या आसपास पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

मुंबई-पुणे प्रवास सुसाट होणार

ट्रान्स हार्बर लिंक रोड आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे जर थेट जोडले गेले तर हा मैलाचा मोठा दगड ठरणार आहे. कारण आता मुंबई ते नवी मुंबई प्रवासाठी गर्दीच्या वेळेला साधारणता दीड तास वाया जातोय. त्यामुळे पुढे पुण्याकडे जाणाऱ्या आणि पुण्याकडून येणाऱ्या अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र याच मार्गवर हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आजच्या काळात शहरांचे स्वरुप मोठे होत आहे. रस्त्यावर वाहनांची सख्याही वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी ही एक अशी समस्या झाली आहे की जिचा सामना प्रत्येकाला कधी ना कधी करावा लागत आहे. त्यामुळे याच वाहतूक कोंडीतून सुटाका करण्याचा नवा प्लॅन एमएमआरडीए आखत आहे.

VIDEO: आधी अहवाल, नंतर नोटीस मगच कारवाई; राणेंच्या बंगल्यात पालिका अधिकाऱ्यांची दोन तास पाहणी

Kirit Somayya | ईडीकडे तक्रार कशी करायची असते? किरीट सोमय्यांनी घेतली राऊतांची शाळा!

मुलुंडमध्ये भाजप-काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक! परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बॅरिकेट्स टाकले

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.