तडीपारीची नोटीस, कोर्टात नेताना मनसैनिकांचा अविनाश जाधवांवर फुलांचा वर्षाव
अविनाश जाधव यांना कापूर बावडी पोलीस ठाण्यातून कोर्टात हजेरीसाठी नेत असताना मनसैनिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव (Avinash Jadhav Police Custody) केला.
ठाणे : मनसेचे ठाणे-पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाणे प्रशासनाने तडीपारीची नोटीस देऊन गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अविनाश जाधव यांना आज (1 ऑगस्ट) ठाणे कोर्टात हजर करण्यात आले. अविनाश जाधव यांना कापूर बावडी पोलीस ठाण्यातून कोर्टात हजेरीसाठी नेत असताना मनसैनिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. यावेळी मनसैनिकांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (Avinash Jadhav tadipar notice Get 2 days Police Custody)
अविनाश जाधव यांना काल (31 जुलै) ठाणे प्रशासनाने तडीपारीची नोटीस देत गुन्हा दाखल केला. यानंतर त्यांना ठाण्यातील कापूर बावडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. अविनाश जाधव यांना कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सोमवारी 3 ऑगस्टपर्यंत अविनाश जाधव यांना पोलीस कोठडीत राहावं लागणार आहे.
अभिजीत पानसेंची प्रतिक्रिया
“हा सर्व प्रकार राजकारणातील सूड बुद्धीने केलेला आहे. मौका सभी को मिलता है, एकवेळ सत्ता आमची देखील असेल, तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरु,” असा इशारा मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिला.
ठाणे : कापूर बावडी पोलीस ठाण्यातून कोर्टातील हजेरीसाठी जाताना मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर पुष्पवृष्टी, मनसैनिकांची घोषणाबाजी, ठाणे प्रशासनाकडून जाधव यांना तडीपारीची नोटीस आणि गुन्हा दाखल @mnsadhikrut pic.twitter.com/KoZBaKeV5p
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 1, 2020
मनसे खपवून घेणार नाही : संदीप देशपांडे
“पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा सर्व डाव आहे. अविनाशने जे आंदोलन केलं त्याचा सर्व मनसेला अभिमान आहे. कुठेही काही चूक केली नाही. ही सत्तेची मोगलाई आहे, हे मनसे खपवून घेणार नाही,” अशी प्रतिक्रिया मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली.
“सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. पण मुळात सरकार कामच करत नाही. म्हणून आंदोलन करावं लागतं आहे. नर्सेसना कामावरून काढून टाकलं म्हणून जाब विचारत आहोत. सत्तेत नव्हता तेव्हा भाजपला हुकूमशाही म्हणत होता, आता तुम्ही काय करता,” असा प्रश्नही संदीप देशपांडे यांनी विचारला.
“जेथे अन्याय दिसेल तेथे मनसेची लाथ बसेल, हा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आदेश आहे. तो आम्ही पाळणार,” असेही संदीप देशपांडे म्हणाले. (Avinash Jadhav tadipar notice Get 2 days Police Custody)
संबंधित बातम्या :
MNS Avinash Jadhav | मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस
अविनाश, आम्ही ठाण्याला येतोय, कोण अडवतंय बघूया, मनसेचा आक्रमक पवित्रा