मुंबईत राहणाऱ्या सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांनी ‘राजगडा’वर या, मनसेचं तातडीचं निमंत्रण
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मुंबईत राहणाऱ्या सर्व सिंधुदुर्गवासीय पदाधिकाऱ्यांना राजगड येथे बोलवण्यात आलं आहे.(MNS Gram Panchayat Election)
मुंबई: ग्रामपंचायत निवडणूकीमुळे(Gram Panchayat Election) गावपुढारी व कार्यकर्ते मंडळींमधील लगबग चांगलीच वाढली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेला संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका लढवण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व सिंधुदुर्गवासीय पदाधिकाऱ्यांना मनसेचे मुख्य कार्यालय राजगड येथे बैठकीसाठी बोलवण्यात आलं आहे. सिंधुदुर्गमधील 70 ग्रामपंचायतींसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामाला लागली आहे. (MNS call meeting for citizens of Sindhudurg lived in Mumbai)
सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींची निवडणूक
सिंधुदुर्गातील 8 तालुक्यातील 70 ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. मनसेने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व सिंधुदुर्गवासीय पदाधिकारी जे मुंबई, ठाण्यात राहतात. ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्यावतीनं सिंधुदुर्गवासीय पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक राजगडावर आयोजित करण्यात आली आहे.
मनसे निवडणुकीची रणनिती ठरवणार
मनसेतर्फे राजगडावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची (Gram Panchayat Election) रणनिती ठरवण्यात येणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शहरी भागात मर्यादित पक्ष अशी ओळख राहिलेली आहे. मात्र,राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे मनसेला ग्रामीण भागात पक्षाचा विस्तार करण्याची संधी मिळणार आहे. राज ठाकरेंच्या ग्रामपंचायत निवडणुका लढवण्याच्या निर्णयामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे.
कोकण ते विदर्भ मनसेची(MNS) जोरदार तयारी
राज्यातील एकूण 14 हजार 232 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. कोकण ते विदर्भ मनसेने ग्रामपंचायत निवडणुकासाठी यावेळी जोरदार तयारी केल्याचे पाहायला मिळाले आहे. मराठवाडा, कोकण, विदर्भातील ग्रामपंचायंत निवडणुकीत मनसेच्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना बळ मिळणार असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगतिलं आहे.
सिंधुदुर्ग हा नारायण राणेंचा बालेकिल्ला
भाजपा खासदार नारायण राणे आणि राज ठाकरे यांचे संबध मैत्रीचे आहेत. त्यामुळे राज्यात सर्व ताकद लावून ग्रामपंयती लढा असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेत. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात होवू घातलेल्या ७० ग्रामपंचायती बाबत मनसेची काय भूमिका असेल ते आजच्या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे. कोकणात सेनेला काटशह देण्यासाठी भाजपा मनसेसोबत हातमिळवणी करणार का हा खरा प्रश्न आहे. एकूणच मनसे कोकणात ग्रामपंचायत निवडणुकांच्या माध्यमातून मतदारांपर्यत पोहचण्याचा प्रयत्न करतंय. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकांची ही मनसेची पहिली पायरी असल्याचे संकेत या माध्यमातून मनसे देत नाही ना असा प्रश्न निर्माण होतोय.
संबंधित बातम्या:
मनसेने शड्डू ठोकला, 4134 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवणार
भाजपच्या गडात मनसेची ताकद, ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मनसैनिक आक्रमक
(MNS call meeting for citizens of Sindhudurg lived in Mumbai)