Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC exam: एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना फोन

एमपीएससीची पूर्व परीक्षा 11 एप्रिलला होणार आहे. | Raj Thackeray Uddhav Thackeray

MPSC exam: एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना फोन
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 11:36 AM

मुंबई: राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी MPSC परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली आहे. यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना फोन केला होता. त्यावेळी दोघांमध्ये MPSC ची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतेही आश्वासन दिले नसले तरी त्यांची भूमिका सकारात्मक असल्याचे समजते. (MNS chief Raj Thackeray calls CM Uddhav Thackeray)

एमपीएससीची पूर्व परीक्षा 11 एप्रिलला होणार आहे. मात्र, वाढत्या कोरोना संसर्गामुळे ही परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विशेष गोष्ट म्हणजे गेल्याच महिन्यात एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले होते. मात्र, आता विद्यार्थ्यांची भूमिका पूर्णपणे बदलली आहे.

कोरोनाचा वाढता धोका पाहता परीक्षेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोव्हिड विषाणूची लागण होऊ शकते. तर अनेक विद्यार्थ्यांना यापूर्वीच कोरोना झाला आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात या परीक्षेची तयारी करणाऱ्या वैभव शितोळे या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून आता संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे.

महाराष्ट्रात कोरोना का वाढला?; राज ठाकरे यांनी सांगितली दोन कारणं

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन करुन वीकेंड लॉकडाऊनच्या निर्णयाला सहकार्य करण्याचे आव्हान केले होते. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या या चर्चेचा तपशील राज ठाकरे यांनी पत्रकारपरिषद घेऊन जाहीर केला होता.

यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीसंदर्भात भाष्य केले होते. बाहेरच्या राज्यातून येणारी माणसं आणि त्यांची न झालेली चाचणी यामुळे कोरोना वाढला. तसेच इतर राज्यात कोरोना रुग्णांची चाचणीच केली जात नाहीत. त्यामुळे त्या राज्यात किती रुग्ण आहेत याचे आकडेच येत नाहीत. महाराष्ट्रात कोरोनाची टेस्टिंग केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचे आकडे बाहेर येतात, असं राज म्हणाले.

राज्यात परत येणाऱ्या बाहेरच्या लोकांची मोजणी करावी आणि त्यांची चाचणी करावी अशी सूचना मी केली होती. परंतु, त्याकडे लक्ष दिलं नाही. कुणाचीही मोजणी आणि चाचणी केली नाही. त्यामुळे ही संख्या वाढली आहे. कोण येतंय कोण जातंय हे कुणालाच माहीत नव्हतं. आज कोरोना आहे, उद्या आणखी काही असेल. हे दुष्टचक्र न थांबणारं आहे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले होते.

संबंधित बातम्या:

Raj Thackeray PC LIVE : दहावी-बारावी विद्यार्थ्यांना प्रमोट करा, राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी

‘किंबहुना’ वापरलं तर चालेल ना; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या शैलीवर मिश्किल टिप्पणी

(MNS chief Raj Thackeray calls CM Uddhav Thackeray)

'मी राक्षेला चितपट केलं, मी खरा...', 'महाराष्ट्र केसरी'चं मोठं वक्तव्य
'मी राक्षेला चितपट केलं, मी खरा...', 'महाराष्ट्र केसरी'चं मोठं वक्तव्य.
मुंबईकरांनो 'म.रे'वरून प्रवास करताय? तुमचा प्रवास होणार 'कूल'
मुंबईकरांनो 'म.रे'वरून प्रवास करताय? तुमचा प्रवास होणार 'कूल'.
शिंदे - शाहांच्या भेटीबद्दल राऊतांचा गौप्यस्फोट
शिंदे - शाहांच्या भेटीबद्दल राऊतांचा गौप्यस्फोट.
गाडीच्या डिक्कीतून निघाला हात बाहेर... नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल
गाडीच्या डिक्कीतून निघाला हात बाहेर... नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 27 खून; राऊतांचा गंभीर आरोप
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 27 खून; राऊतांचा गंभीर आरोप.
डीजे क्रेटेक्सने कुकरीने केक कापला; सुरज चव्हाण देखील उपस्थित
डीजे क्रेटेक्सने कुकरीने केक कापला; सुरज चव्हाण देखील उपस्थित.
बोगस शिक्षक भरती घोटाळा; मुख्य आरोपीची ऑडिओ क्लिप व्हायरल
बोगस शिक्षक भरती घोटाळा; मुख्य आरोपीची ऑडिओ क्लिप व्हायरल.
लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात, 1500 नाही तर मिळणार फक्त 500 रुपये
लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात, 1500 नाही तर मिळणार फक्त 500 रुपये.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 2 मोठ्या घोषणा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 2 मोठ्या घोषणा.
पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड
पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड.