Raj Thackeray PC Highlights : दहावी-बारावी विद्यार्थ्यांना प्रमोट करा, राज ठाकरे यांची पत्रकार परिषद जशीच्या तशी
MNS chief Raj Thackeray Press Conference LIVE : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर भाष्य केलं.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर भाष्य केलं. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काल झूम मीटिंगद्वारे झालेल्या चर्चेचा तपशील पत्रकार परिषदेत सांगितला. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या केल्या. यामध्ये दहावी-बारावी विद्यार्थ्यांना प्रमोट करा, छोट्या व्यापाऱ्यांना आठवड्यातून 2-3 दिवस दुकानं उघडण्यासाठी सूट द्या, खेळाडूंना जीम, स्वीमिंग पूलमध्ये सवलत द्या, बँकाची जबरदस्ती वसुली थांबवा अशा विविध मागण्या केल्या.
लॉकडाऊनमध्ये जे कामगार परत गेले त्यावेळी मी मागणी केली होती, जे लोक परत येतील त्यांची मोजणी करा आणि चाचणी करा. पण त्यांची मोजणी झालीच नाही. आज कोरोना आहे, उद्या दुसरं काही असेल, हे दुष्टचक्र न थांबणारं आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
कोरोना लाट महाराष्ट्रातच का दिसतेय?
पुन्हा एकदा लॉकडाऊन हे लोकांमध्ये पसरलं, पेशंट वाढत आहेत, किंबहुना (हा शब्द वापरला तर चालेल ना) आधी जी लाट आली, त्यापेक्षा मोठी लाट आहे. माझं काल मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, कोरोना हे फक्त महाराष्ट्रातच का दिसतंय?
त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य आहे. बाहेरुन येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका, शेतकऱ्यांचे मोर्चे सुरु आहेत, तिकडे कोरोना, किंवा लाटा नाहीत. हे महाराष्ट्रातच सर्व सुरु आहे. देशात महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे कोरोना असल्याचं चित्र आहे. त्याचं एक कारण म्हणजे बाहेरुन येणाऱ्यांची संख्या आणि दुसरं म्हणजे तिकडे कोरोनाचे पेशंट मोजले जात नाहीत, त्यामुळे ते आकडे समोर येत नाहीत. तिथे मोजले तर असेच आकडे समोर येतील, असं राज ठाकरे म्हणाले.
LIVETV – राज ठाकरे यांची पत्रकार परिषद
LIVE NEWS & UPDATES
-
Raj Thackeray on Jameel Shaikh Murder : नजीब मुल्लावर कारवाई करा, खुनाने उत्तर खुनाने योग्य नाही
मनसेचा पक्षाचा पदाधिकारी जमील शेख यांची हत्या झाली , उत्तर प्रदेश पर्यंत तपास करण्यात आला , यात राष्ट्रवादीचा नगरसेवक नजीब मुल्लाचं नाव आलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांची प्रेसनोट आहे, त्यामध्ये नजीम मुल्लाचं नाव आहे. सत्ताधारीची लोक दिवसा ढवळा लोकांना मारत आहेत. याच नजीम मुल्लाचं नाव सूरज परमार बिल्डर आत्महत्या प्रकरणात आहे. ती केसही रफादफा झाली. आता पुन्हा नाव आलं आहे. आता राज्य सरकार काय करतंय हे पाहतोय.. याबाबत शरद पवारांची भेट घेणार आहे.. अशी मंडळी यांना सांभाळायची असतील, तर दुसऱ्यांचे हात बांधिल नसतात.. खुनाचे उत्तर खुनाने अशा गोष्टी महाराष्ट्रात सुरु झाल्या तर हे चित्र चांगले दिसणार नाही, नजीब मुल्ला याच्यावर कारवाई आणि शिक्षा होणं आवश्यक आहे, त्यासाठी पवारांचे भेट घेणार
-
Raj Thackeray PC LIVE : मंत्र्यांनीही गैर कृत्य करु नये
40 दिवसात राजीनामे हे काहीतरी केलंय म्ङणून राजीनामे दिले. सरकार पाडण्यासाठी प्रयत्न होत आहेत म्हणजे मंत्र्यांकडूनही काही होत आहे. ती काही इमारत आहे का पिलर काढले आणि पडले, मंत्र्यांनीही गैर कृत्य करु नये
-
-
Raj Thackeray on Param Bir Singh : परमबीर सिंगांना बदलीनंतर साक्षात्कार
परमबीर सिंग यांना 100 कोटींचा साक्षात्कार त्यांच्या बदलीनंतर का झाला? बदली झाली नसती तर हा साक्षात्कार झाला नसता का? पण ते बोलले बारमधून पैसे गोळा करा, हे लांच्छनास्पद आहे. बदल्यांचे बाजार होतातच.
-
Raj Thackeray PC LIVE : लॉकडाऊनमध्ये देशमुखांचे बारही बंद
सर्वजण लॉकडाऊन पाळतील अशी आशा आहे. काय सुरु काय बंद याला खूप वेगवेगळे अँगल आहेत. देशमुखांचे बार पण बंद आहेत.
-
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये राज्य आलंय की त्यांच्यावर राज्य आलंय
उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये राज्य आलंय की त्यांच्यावर राज्य आलंय, काल मला हा कोणीतरी विनोद पाठवला
-
-
Raj Thackeray on Sushant Singh Rajput : आत्महत्या केली सुशांत सिंह राजपूतने आणि जेलमध्ये गेला अर्णब गोस्वामी
सुशांतच्या केसमध्ये आत्महत्या केली सुशांत सिंह राजपूतने आणि जेलमध्ये गेला अर्णब गोस्वामी.. कशाचा कशाशी संबंध?
-
Raj Thackeray on Anil Deshmukh : अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नव्हता, महत्त्वावा विषय तर ‘तो’ आहे
माझ्यासाठी अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नव्हता. विषय होता मुकेश अंबानींच्या घराखाली पोलिसाने बॉम्बची गाडी ठेवली, त्याची चौकशी होणार आहे का? विषय हा आहे बॉम्बची गाडी पोलिसांनी ठेवली ती कुणाच्या सांगण्यावरुन ठेवली? पोलीस कुणीतरी सांगितल्याशिवाय असं कृत्य करणार नाही. पण चौकशी अनिल देशमुखांची होईलच, पण ही गाडी कुणाच्या सांगण्यावरुन ठेवली याची चौकशी व्हावी.
विषयाला फाटा नको. मूळ विषय भरकटत जातो आणि कशापासून सुरु होतो हे आपण पाहातच नाही
-
Raj Thackeray PC LIVE : आरोग्य या विषयावर राज्य आणि केंद्राने लक्ष देणं आवश्यक
मुलांची वयं वाढत आहेत, परीक्षा पुढे पुढे ढकलत आहेत, याचं उत्तर कुणाकडे आहे माहित नाही. आरोग्य या विषयावर राज्य आणि केंद्राने लक्ष देणं आवश्यक
सरकारचे सल्लागार कोण आणि किती हे माहिती नाही. जमिनीवर आपल्याला तयारी नाही हे दिसतंय
-
Raj Thackeray PC LIVE : लसीकरण वाढवायला हवं, त्याला वयाचं बंधन नको
लसीकरण वाढवायला हवं, त्याला वयाचं बंधन नको, त्यातील टेक्नीकल बाबी मला माहिती नाहीत, पण वयाचं बंधन नको
-
Raj Thackeray PC LIVE : आज लाट इकडे आहे, उद्या तिकडे आहे
एकट्या राज्य सरकारला बोलून चालणार नाही, कोरोना हा देशाचा विषय आहे. आज लाट इकडे आहे उद्या तिकडे असेल. आरोग्य व्यवस्थेकडे गांभीर्याने पाहणे गरजेचं.
-
Raj Thackeray PC LIVE : रुग्णालयांना जाणीव करुन द्या, आमची पद्धत वेगळी आहे
अर्थव्यवस्था कोसळली आहेच पण समाजमनही कोसळलं आहे. आज रुग्णांना बेड मिळत नाहीत. बेड असून दिले जात नाहीत. हॉस्पिटलकडे बडे असून जर दिली जात नसतील, तर ती असून उपयोगाची काय? हे सर्व महापालिकांची यंत्रणा वापरतात, राज्यावर संकट येतं तेव्हा मदत करायला नको का? ठाण्यात ग्लोबल हॉस्पिटलमध्ये १ हजार बेड आहेत, मात्र दिले जात नाहीत.. आमदार-नगरसेवक फोन करतात त्यांना द्यावं लागतो असं सांगतात.. याला काय अर्थ आहे.. सामान्य माणसांना मिळणार नाही का?
या हॉस्पिटलना जाणीवा नसतील तर ती करुन दिली पाहिजे.. आमच्या जाणीवा करुन देण्याची पद्धती वेगळ्या आहेत
-
Raj Thackeray PC LIVE : राज ठाकरे यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना
माझ्याकडे अनेक तक्रारी आणि सूचना आल्या होत्या, त्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या. काही सूचना केल्या
उत्पादनाबाबत – जे छोटे उद्योग आहेत, त्यांना उत्पादन करायला सांगितलंय पण विक्रीला बंदी आहे, असं असेल तर उत्पादन करुन ठेवायचं कुठे, विकायचं नाही तर उत्पादन का करायचं… म्हणून मी सांगितलं दोन तीन दिवस विक्रीसाठी सुरु ठेवा. छोट्या व्यापाऱ्यांना आठवड्यातून २-३ दिवस दुकानं सुरु करण्यास परवानगी द्या
बँकांची जबरदस्ती – अनेकांनी छोटी मोठी कर्ज घेतली आहेत. बँकांकडे पैसा गेला पाहिजे मान्य, पण लोकांकडे पैसा असेल तर बँकात जाईल. सक्तीने वसूल केलं जात आहे. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे, मग लोकांनी हप्ते कसे भरावे?
वीज बिल – सरसकट लॉकडाऊन काळात वीजबिल माफ करणे
व्यवसाय कर – जीएसटीबाबत व्यापाऱ्यांना सूट द्या, राज्याने केंद्राशी बोलावं
कंत्राटी कामगार – लॉकडाऊनमध्ये सरकारी कंत्राटी कामगारांना घेतलं होतं, पण नंतर काढून टाकलं.. मी सूचना केली, त्यांना घ्या, तहान लागली की विहीर खोदणं योग्य नाही़
या सूचना योग्य आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले, मंत्रिमंडळाशी बोलण्याचं आश्वासन दिलं.
जीम, सलून यांनाही दोन-तीन दिवस सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी
स्वीमिंग पूल बंद ठिक आहे.. पण खेळाडूंना सवलत हवी. स्वीमिंग पूल असो वा अन्य खेळ, बॉडी बिल्डरना सराव करण्यासाठी जीम सुरु ठेवावी.
सरकारची तिजोरी माहिती आहे- शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा. शेतकरी जर कोसळला तर पुन्हा अजून मोठं संकट येईल
शेवटची सूचना शाळा- शाळा बंद आहेत, पण शाळांच्या फी तशाच आहेत. या शाळांना फी घेऊ नका, अर्धी घ्या किंवा काहीही…
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, परीक्षा न घेता पास करा.. ते कोणत्या मानसिकतेत माहिती नाहीत.. ही पोरं तर लहान, कुठून अभ्यास करणार , कशा परीक्षा देणार, माहिती नाहीत
खालच्या विद्यार्थ्यांना प्रमोट केलं, तसं दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढे ढकला.
-
Raj Thackeray PC LIVE : मी सांगितलं होतं, जे लोक परत येतील त्यांची मोजणी करा
लॉकडाऊनमध्ये जे कामगार परत गेले त्यावेळी मी मागणी केली होती, जे लोक परत येतील त्यांची मोजणी करा आणि चाचणी करा. पण त्यांची मोजणी झालीच नाही. आज कोरोना आहे, उद्या दुसरं काही असेल, हे दुष्टचक्र न थांबणारं
-
Raj Thackeray PC LIVE : कोरोना लाट महाराष्ट्रातच का दिसतेय?
पुन्हा एकदा लॉकडाऊन हे लोकांमध्ये पसरलं, पेशंट वाढत आहेत, किंबहुना (हा शब्द वापरला तर चालेल ना) आधी जी लाट आली, त्यापेक्षा मोठी लाट आहे. माझं काल मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, हे महाराष्ट्रातच का दिसतंय?
महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य, बाहेरुन येणाऱ्यांची संख्या जास्त, पश्चिम बंगालमध्ये निवडणुका, शेतकऱ्यांचे मोर्चे सुरु आहेत, तिकडे कोरोना, किंवा लाटा नाहीत. हे महाराष्ट्रातच सर्व सुरु आहे. देशात महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे कोरोना असल्याचं चित्र
त्याचं एक कारण म्हणजे बाहेरुन येणाऱ्यांची संख्या आणि दुसरं म्हणजे तिकडे कोरोनाचे पेशंट मोजले जात नाहीत, त्यामुळे ते आकडे समोर येत नाहीत. तिथे मोजले तर असेच आकडे समोर येतील.
-
Raj Thackeray PC LIVE : माझं मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं, ते सांगण्यासाठी पत्रकार परिषद
काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. या लॉकडाऊनबाबत भेटीची विनंती केली होती, त्यांचा फोन आला की त्यांच्या आजूबाजूला अनेक लोक कोव्हिड पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतलंत आहे. त्यामुळे झूमवर बोलण्याचं ठरलं. आम्ही दोघंच असल्यामुळे आमच्यात काय बोलणं झालं, हे सांगण्यासाठी मी आज भेटतोय
-
Raj Thackeray press Live : वाझेंना शिवसेनेत कुणी आणलं?
राज ठाकरे यांनी 21 मार्चला पत्रकारांशी संवाद साधला होता, त्यावेळी राज ठाकरे काय म्हणाले होते?
सचिन वाझे हा मुख्यमंत्र्यांचा अत्यंत जवळचा होता. वाझेंना शिवसेनेते प्रवेश करण्यासाठी कोण घेऊन गेलं होतं, हे अजूनही बाहेर आलेलं नाही. वाझेंना पुन्हा पोलीस दलात घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आग्रह धरला होता. फडणवीसांनीच हे सांगितलं आहे. याचा अर्थ एवढाच की वाझे हे उद्धव ठाकरेंच्या जवळचे होते. उद्धव ठाकरे आणि अंबानी यांचे मधूर संबंध आहेत. उद्धव यांच्या शपथविधीला अंबानी कुटुंब सहपरिवार हजर होते. मग वाझे बॉम्बची गाडी कुणी सांगितल्याशिवाय अंबानीच्या घराखाली ठेवेल काय? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
-
Raj Thackeray PC LIVE : थोड्याच वेळात राज ठाकरे माध्यमांशी संवाद साधणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार, अनिल देशमुख यांचा राजीनामा ते सीबीआय चौकशी, राज ठाकरे नेमकं कोणत्या विषयांवर बोलणार याची उत्सुकता.
Published On - Apr 06,2021 12:06 PM