‘हे फक्त अतिक्रमण नव्हे तर…’, माहीम समुद्रातील अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया!

माहिमच्या समुद्रातील अनधिकृत मशिदीचं दृश्य दाखवत खळबळ उडवली होती. अशातच मशिद हटवल्यानंतर राज ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

'हे फक्त अतिक्रमण नव्हे तर...', माहीम समुद्रातील अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया!
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 6:29 PM

मंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी मनसे मेळाव्यात शिवतीर्थावर सभा घेतली होती. यामध्ये त्यांनी माहिमच्या समुद्रातील अनधिकृत मजारीचं दृश्य दाखवत खळबळ उडवली होती. तसेच एका महिन्याचा अल्टिमेटम सरकारला दिला होता. मात्र सभा संपताच पोलिसांनी तिथे जाऊन पाहणी केली होती. दुसऱ्या दिवशी सरकारने अनधिकृत मजार हटवली. राज ठाकरे यांच्या या कृतीमुळे राज्य भरातून त्यांचं कौतुक केलं गेलं. त्यासोबतच त्यांच्यावर टीकाही झाली. अशातच मजार हटवल्यानंतर राज ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे-

धर्मांध मुस्लिमांनी मुंबईत माहीमच्या समुद्रात बांधलेल्या अनधिकृत मजारीची, सांगलीत कुपवाडच्या हिंदू वस्तीत परवानगी नसताना अतिक्रमण करून बांधलेल्या अनधिकृत मजारीची दृश्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात व्हिडिओद्वारे दाखवली आणि अनेकांना धक्का बसला. तात्काळ दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने त्या अनधिकृत बांधकामांवर तडक कारवाई केली त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई मनपा आयुक्त इक्बाल चेहेल यांच्यासह सर्वांचे आभार राज ठाकरे यांनी मानले आहेत.

आपल्या डोळ्यादेखत अशी अतिक्रमणं राज्यभर सुरु आहेत, लक्षात घ्या हे फक्त अतिक्रमण नव्हे तर धार्मिक स्थळांच्या आडून केलेलं हे आक्रमणच आहे. त्यावर वेळीच उपाययोजना नाही झाली तर हेच आपल्याला भविष्यात त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे शासन-प्रशासनासह प्रत्येक हिंदू बांधवानेही दक्ष राहायलाच हवं, असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं आहे.

राज ठाकरे यांच्या दाव्यावरून आरोप प्रत्यारोप

माहिममधील या मजारीचं बांधकाम हे दोन वर्षांआधीचं असल्याचं म्हणत राज ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र ठाकरे गटाकडून याबाबतची बातमी 2007 मध्येच प्रसिद्ध केलीये अशी माहिती उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी दिली. तसेच या सर्व आरोपानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अनेक अनुयायी मजारीपर्यंत जाताना दिसत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडीओ  2018 सालचा हा व्हिडीओ आहे त्यामुळे राज ठाकरेंनी दोन वर्षांआधीचं मजारीचं बांधकाम असल्याच्या दाव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या शंकेला मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी उत्तर दिलं आहे

मजारी ही आधीपासूनच आहे मात्रव त्याच्या बाजूचं बांधकाम हे दोन वर्षांपूर्वी झाल्याची प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे. या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे कारण याआधी मशिदीवरील भोग्यांचा मुद्दा पेटला होता. त्याप्रमाणेच आता राज्यातील धार्मिक अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पेटू शकतो.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.