‘दिवाळीतील गोड बातमी कुठे गेली?’, म्हणत मनसेची एका मंत्र्याविरोधात तक्रार

मनेसे नेते यशवंत किल्लेदार यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर फसवणुकीचा आरोपाखाली तक्रार दाखल केली आहे. (MNS file complaint Nitin Raut)

'दिवाळीतील गोड बातमी कुठे गेली?', म्हणत मनसेची एका मंत्र्याविरोधात तक्रार
नितीन राऊत आणि राज ठाकरे
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 1:07 PM

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन मनसे पक्ष पुन्हा एकादा आक्रमक झाला आहे. मनेसे नेते यशवंत किल्लेदार यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर वाढीव वीजबिलाबाबत फसवणुकीच्या आरोपाखाली तक्रार दाखल केली आहे. (MNS file complaint against energy minister Nitin Raut)

मागील काही दिवसांपासून वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन भाजप, मनसे तसेच इतर विरोधीपक्ष महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरत आहेत. नागिराकंना वाढीव विजबिलातून सूट देण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. याच मागणीला घेऊन मनसेने यापूर्वी मुंबईत निदर्शन केले होते. त्यावेळी मनेसेने केलेली पोस्टरबाजी हा राज्यभर चर्चेचा विषय बनला होता. आता पुन्हा याच मुद्द्यावरुन मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मनसेचे नेते यशवंद किल्लेदार यांनी थेट उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत नितीन राऊत यांनी फसवणूक केल्याचं त्यांनी म्हटलंय.

राज्यपाल मंत्र्यांना भेटलो, मात्र कारवाई नाही

“ऊर्जा विभागातील मंत्री आणि अधिकाऱ्यांविरोधात आम्ही तक्रार केली आहे. लॉकडाऊनमध्ये मीटर रिडिंग झालं नाही. आधीच लोक वैतागलेले असताना अधिकचे दर लावून नागरिकांना बील पाठवले गेले. याबाबत आम्ही मंत्र्यांना भेटलो. राज्यपालांशीही आम्ही याबाबत चर्चा केली. मात्र यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही,” असे तक्रारदार य़शवंत किल्लेदार म्हणाले. तसेच, दिवाळीला गोड बातमी मिळेल असं मंत्र्यांनी सांगितलं होतं. मात्र, तसं काही झालं नाही. सरकारने लोकांची फसवणूक केली आहे, असा आरोपही त्यांनी सरकारवर केला.

दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (25 जानेवारी) वीजबिलावरुन सरकारला धारेवर धरलं. जेवढी वीज वापरली तेवढे बील देऊ, पण जी वीज वापरलीच नाही ते वीजबिल देणार नाही, असे फडणवीसांनी सरकारला ठणकावले होते. त्यानंतर आता मनसेने उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे.

संबंधित बातम्या :

वीजबील प्रकरणात मनसेची नवी भूमिका, राज ठाकरेंचे कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश

लोकांना अंधारात ढकलणाऱ्या सरकारला गाडून टाका, वीज बिल मुद्यावर मनसे आक्रमक

वीज बिलावर ऊर्जामंत्री राऊत बोलले, आता अजित पवार, नेमकं काय होणार?

(MNS file complaint against energy minister Nitin Raut)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.