MNS Gajanan Kale : संजय राऊतांमध्ये कादर खान घुसलाय, हा रोजचा तमाशा बंद करा, गजानन काळेंचा हल्लाबोल
आजकाल हिंदुत्वावर बोलणारे राज ठाकरे हे भाजपचे नव ओवैसी आहेत. अशी टीका सतत संजय राऊत करत आहेत. या संजय राऊतांना मनसे नेतेही जशास तसे उत्तर देत आहेत. आज मनसे नेते गजानन काळे यांनी राऊतांच्या टीकेचा समाचार घेतला आहे.
मुंबई : राज्यात सध्या मनसे (MNS vs Shivsena) आणि शिवसेनेत पुन्हा जोरदार सामना सुरू झालाय. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) अलिकडे हिंदुत्वाचा (Hindutva) मुद्दा जास्तच उतलून धरला. त्यानंतर शिवसेनेही राज ठाकरेंना त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिले. राज ठाकरेंनी त्यांचा अयोध्या दौरा घोषित केला. तर दुसरीकडे लगेच आदित्य ठाकरे यांचाही अयोध्येचा दौरा घोषित झाला. हे दौऱ्यांचं राजकारण तापलं असतानाच दुसरीकडून संजय राऊत हे रोज होणाऱ्या पत्रकार परिषदेतून भाजपवर आणि मनसेवर हल्लाबोल चढवत आहेत. हिंदुत्वावर सर्वात जास्त अधिकार हा शिवसेनेचा आहे. हिदुत्वासाठी सर्वांत जास्त त्याग हा शिवसेनेचा आहे. आजकाल हिंदुत्वावर बोलणारे राज ठाकरे हे भाजपचे नव ओवैसी आहेत. अशी टीका सतत संजय राऊत करत आहेत. या संजय राऊतांना मनसे नेतेही जशास तसे उत्तर देत आहेत. आज मनसे नेते गजानन काळे यांनी राऊतांच्या टीकेचा समाचार घेतला आहे.
काय म्हणाले गजानन काळे?
शिवसेना आमदार रमेश लटकेंना मनसेनं वाहली श्रद्धांजली वाहिली त्यावेळी बोलताना गजानन काळे म्हणाले, आज एवढं मोठं नुकसान झालंय तरी कादर खान सामनावीर संजय राऊत यांनी आज बोलणं टाळलं असतं तर चांगलं झालं असतं. पण त्यांच्यात कादरखान घुसलाय त्याला काय करणार. राऊतांनी स्वतःचे बॅाडीगार्ड बाजुला ठेवावे. त्यांनी सुरक्षेवर बोलू नये. कादर खानला सिनेमात जसे लोकं कंटाळून टमाटर मारतात, तसं आपल्या पक्षात काय सुरु आहे याचा कानोसा घ्या, राऊत हा रोजचा तमाशा बंद करा लोकं कंटाळली आहेत, अशी खरपूस टीका काळे यांनी केली आहे.
आम्ही राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी समर्थ
हृदयात राम आणि हाताला काम हे हिदुत्व आहे असं बोलले जातंय. पण 82 वर्षाच्या आजीच्या घरी गेल्यावर काय अवस्था झाली होती असा सवालही त्यांनी विचारला आहे. तसेच आम्ही राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी सक्षम आहोत. संजय राऊत यांची पात्रता नाही राज ठाकरेंवर बोलण्याची. तुम्ही संपादक कसे झाला आहेत. हे अवध्या महाराष्ट्राला माहित आहे. आमच्या तोंडून वधवून घेऊ नका. बाळासाहेबांनी जी वचनं दिली होती ती उद्याच्या सभेत जाहीर करावी. भोंगे बंद झाले पाहिजेत. रस्त्यावरचा नमाज बंद झाला पाहिजे. हे जर संजय राऊतांनी घोषित केलं तरी आम्ही त्याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करू, असा खोचक टोला मनसे नेते गजानन काळे यांनी लगावला आहे.