Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाढीव वीजबिलाविरोधात मनसेची पोस्टरबाजी; पोलीस, बेस्ट प्रशासनाने होर्डिंग्ज हटवले

वाढीव वीजबिलाबाबत शिवाजी पोलीस ठाणे परिसर, दादर तसेच माहीम परिसरात मनसेने लावलेले होर्डिंग्ज काढण्यात आले आहेत. बेस्ट प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

वाढीव वीजबिलाविरोधात मनसेची पोस्टरबाजी; पोलीस, बेस्ट प्रशासनाने होर्डिंग्ज हटवले
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 4:36 PM

मुंबई : वाढीव वीजबिलाबाबत शिवाजी पोलीस ठाणे परिसर, दादर तसेच माहीम परिसरात मनसेने लावलेले होर्डिंग्ज काढण्यात आले आहेत. बेस्ट प्रशासनाने ही कारवाई केली आहे. तसेच, मनसे नेते यशवंत किल्लेदार यांना शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात बोलावून बेकायदेशीरपणे लावलेले बॅनर काढण्यासंबंधी पोलिसांनी सांगितले आहे. यावर बोलतातना, आमचा उद्देश साध्य झाला आसून आम्ही कुठलेही बॅनर बेकायदेशीरपणे लावलेले नाही, असे स्पष्टीकरण किल्लेदार यांनी दिले. (MNS hoardings regarding electricity bill have been removed)

राज्यात वाढीव वीजबिलाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. याच मुद्द्याला घेऊन राज्यातील महाविकास आघाडी सरकारला घेरलं जात आहे. मनसेनेही वाढीव वीजबिलाबाबत सरकारला धारेवर धरत सोमवारनंतर वीज दरवाढीविरोधात आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने मनसेने दादर, माहीम परिसरात खास होर्डिंग्ज लावले होते. यामध्ये ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ या राज्य सरकारच्या घोषणेलाच टार्गेट करत ‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, ‘सोमवारी भेटूच शॉकसाठी तयार राहा’, अशी खोचक वाक्यं या होर्डिंगजवर लिहिली होती. मनसेची ही मार्मिक पोस्टरबाजी मुंबई तसेच राज्यभरात चर्चेचा विषय बनली होती.

त्यानंतर या होर्डिंग्जची दखल घेत, मुंबई प्रशासनाने माहीम, दादर परिसरातील हे होर्डिंग्ज बेस्ट प्रशासनाच्या मदतीने काढले आहेत. तसेच मनसे नेते यशवंत किल्लेदार यांना शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात बोलावून वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी पोस्टर काढण्यास सांगितले. यावर “राज्य सरकारच्या धोरणाविरोधात आम्ही लावलेल्या पोस्टर्सचा उद्देश साध्य झाला आहे. बसस्टॉपवर बॅनर लावण्यासाठी एजन्सी असते. बेस्ट प्रशासनाने नेमलेल्या जाहिरातदाराकडूनच आम्ही बॅनर लावले आहेत.” असं स्पष्टीकरण किल्लेदार यांनी दिलं.

दरम्यान, आम्ही केवळ सरकारला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देत आहोत, त्यामुळेच ही होर्डिंगबाजी करण्यात आली आहे. सोमवारी वीजदरवाढी विरोधात आंदोलन करण्याचा आमच्या पक्षाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवारपासून तुम्हाला आमचं आंदोलन दिसूनच येईल, असं यशवंत किल्लेदार म्हणाले होते.

संंबंधित बातम्या :

वीज बिलाच्या मुद्द्यावरुन मनसे आक्रमक, 26 नोव्हेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा

भाजप सर्व निवडणुका स्वबळावर लढणार; फडणवीसांनी मनसेसोबत युतीची शक्यता फेटाळली

‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, सोमवारी ‘शॉक’साठी तयार राहा; मनसेची माहीम, दादरमध्ये खोचक होर्डिंगबाजी

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.