‘तुमच्यात जेवढी… बिल्डरसारख्या औलादींना तेच हवं असतं’; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
वरळीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते 'वरळी व्हिजन' या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आपल्या भाषणामध्ये बोलताना ठाकरेंनी बिल्डर लोकांना जमीन देताना एक सल्ला दिला आहे. जर ती गोष्ट नाही केली तर त्याचा तुम्हालाच तोटा असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले जाणून घ्या.
आपल्याकडे डेव्हल्पमेंट प्लान होतं, पण टाऊन प्लानिंग होत नाही. आपल्याकडे किती लोकसंख्या वाढणार, तेवढे रस्ते आहे का, कॉलेज, हॉस्पिटल येणार का, मार्केट येणार आहे का, थिएटर येणार का याचा विचार केला जात नाही. आम्ही त्याचा विचार करत नाही. आपण फक्त स्क्वेअर फुटात अडकलोय. राहिल्या आल्यानंतर जगायचं कसं याचे प्रश्न विचारतो का? असा सवाल राज ठाकरे यांनी प्रत्येकाला केला. आम्हीच प्रश्न विचारत नाही. तुमची स्वत:ची हक्काची जमीन समोरच्याला देत असताना तुम्ही प्रश्न विचारत नाही. बिल्डरसारख्या औलादींना हेच त्यांना हवं असतं. तुमच्यात जेवढी फुट पडेल तेवढं त्यांना हवंच असतं. राजकारणी आहेच बसलेले, तुम्ही एकत्र राहणं, विचार करणं गरजेचं आहे. एकमुखाने विचार करून बोलणं महत्त्वाचं आहे. तर हाताला काही गोष्टी लागतील, असं राज ठाकरे म्हणाले.
मुंबईतील लोक येतात त्यांची संख्या किती. बाहेरून लोक येतात, त्यामुळे त्यांना सुविधा पाहिजे. त्यासाठी रस्ते, पूल आणि सर्व गोष्टी वाढवली जात आहे. आमचा सर्व पैसा या सुविधांवर खर्च होत आहे. महाराष्ट्रासाठी खर्च होत नाही. शेतकरी आत्महत्या होत आहे. हा पैसा मूळ सुविधेवर खर्च न होता, या सर्व गोष्टीवर खर्च होत असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ठाणे जिल्हा जगाच्या पाठिवर असा जिल्हा मिळणार नाही. या देशात तर नाहीच नाही. पंचायत ते महापालिका या स्टेप्स लोकसंख्येवर ठरतात. आज मुंबई शहरात एक महापालिका आहे. पुणे जिल्ह्यात दोन महापालिका आहेत. सर्व जिल्ह्यातील महापालिका पाहिल्या तर एक किंवा दोन आहेत. ठाणे हा एकमेव जिल्हा आहे, तिथे आठ महापालिका आहेत. (लोकांनी टाळ्या वाजवल्या, ठाकरे म्हणाले, तीच टाळी गालावर वाजवून घेऊ) बाहेरच्या लोकांची सर्वाधिक लोकसंख्या ठाणे जिल्ह्यात येते. त्यानंतर ते मुंबई आणि पुण्यात जातात. कुठून आणणार सुविधा. यावर खर्च होतात. इथला माणूस सुखी झाल्यावर बाहेरचे लोक आले तर समजून घेईल. पण इथला माणूस बेघर होतोय आणि बाहेरच्यांना कडेवर घ्यायचं तर कसं व्हायचं, असं म्हणत ठाकरेंनी परराज्यातील वाढत्या लोंढ्यांबाबत भाष्य केलं.
आपल्याकडे काय चाललंय एवढे स्क्वेअर फूट वाढवून द्या- राज ठाकरे
बीकेसीत 20 वर्षापूर्वी तिकडच्या झोपडीधारकांना अनधिकृत झोपड्या, त्यांना ऑफर होती घर मिळेल किंवा एक कोटी रुपये मिळेल. अन् आपल्याकडे काय चाललंय एवढे स्क्वेअर फूट वाढवून द्या. दोन कुटुंबामागे एका गाडीचं पार्किंग हा अजब प्रकार ऐकला. आज हा चालवणार उद्या तो चालवणार. तुम्हाला किंमत नाहीये हे लक्षात घ्या