Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मविआच्या ‘या’ आमदाराकडेही रेमडेसिवीरचा साठा, पण वाटप करत नाही, मनसेचा गंभीर आरोप

मनसेचे युवानेते अखिल चित्रे यांनी काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांच्याकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा आहे, पण ते त्याचं वाटप करत नसल्याचा गंभीर आरोप केलाय.

मविआच्या 'या' आमदाराकडेही रेमडेसिवीरचा साठा, पण वाटप करत नाही, मनसेचा गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Apr 19, 2021 | 1:27 AM

मुंबई : महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांसोबतच त्यावर उपचारात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या रेमडिसिवीर इंजेक्शनवरुन (Remedisivir injection) चांगलंच वातावरण तापलंय. मनसेचे युवानेते अखिल चित्रे यांनी काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांच्याकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा आहे, पण ते त्याचं वाटप करत नसल्याचा गंभीर आरोप केलाय. तसेच या प्रकरणावरही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बोलावं, असं आव्हान चित्रे यांनी दिलंय. जनतेचा जीव महत्त्वाचा आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळणं महत्त्वाचं आहे. तुमचं राजकारण बंद करा, असंही मत अखिल चित्रे यांनी व्यक्त केलं (MNS leader Akhil Chitre criticize MVA and Nawab Malik over Remdisivir injection shortage).

अखिल चित्रे म्हणाले, “रेमडेसिवीरचा साठा तर आपल्या मविआ आमदार झिशान सिद्दीकी याच्याकडे सुद्धा आहे, पण ते वाटप करत आहेत. नवाब मलिक यांनी याबाबत पण जरा बोलावं. तुमचं राजकारण बंद करा. जनतेचा जीव महत्त्वाचा आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना रेमडेसिवीर (Remdisivir) उपलब्ध होणे गरजेचे आहे.”

महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, केंद्राची कंपन्यांना धमकी; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, नाही तर कारवाई केली जाईल, अशी धमकी केंद्राने औषध विक्रेत्या कंपन्याना दिल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला होता. मलिक यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील 16 निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या 20 लाख रेमडेसिवीरचे इंजेक्शन विकायला परवानगी मिळत नाहीये. केंद्र सरकार त्यास नकार देत आहेत, असा आरोप मलिक यांनी केलाय.

परवाना रद्द करणार

दरम्यान राज्य सरकारने 16 निर्यात कंपन्यांकडे रेमडेसिवीरबाबत विचारणा केली असता केंद्रसरकारने महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषध पुरवठा करण्यास बंदी घातली आहे. जर आम्ही हे रेमडेसिवीर दिल्यास परवाना रद्द करण्याची धमकी दिली आहे, अशी धक्कादायक माहिती या कंपन्यांनी दिली असून हे खेदजनक आणि धक्कादायक असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे.

तर साठा ताब्यात घेऊ

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता रेमडेसिवीरची कमतरता भासू लागली असतानाच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या परिस्थितीत महाराष्ट्र सरकारकडे या 16 निर्यातदारांकडून रेमडेसिवीरचा साठा ताब्यात घेऊन गरजूंना पुरवण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा :

‘रेमडेसिव्हीर’चा पुरवठा सुरळीत करण्यासाठी आता जिल्हा स्तरावर कंट्रोल रुम, सरकारना महत्वाचा निर्णय

Corona Vaccine : देशात कोरोना लसीचा तुटवडा नाही, रेमजेसिव्हीरचं उत्पादन वाढवण्याचे आदेश- डॉ. हर्षवर्धन

रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्याचे फडणवीसांनी वकीलपत्रं घेतलं काय?; नवाब मलिक यांचा सवाल

व्हिडीओ पाहा :

MNS leader Akhil Chitre criticize MVA and Nawab Malik over Remdisivir injection shortage

माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.