लॉकडाऊनपेक्षा मृत्यूदर कसा कमी करता येईल याचे नियोजन करा, बाळा नांदगावकरांचा सल्ला

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून कठोर निर्बंध लादण्यात येत आहेत. (Bala Nandgaonkar Maharashtra Lockdown)

लॉकडाऊनपेक्षा मृत्यूदर कसा कमी करता येईल याचे नियोजन करा, बाळा नांदगावकरांचा सल्ला
बाळा नांदगावकर, मनसे नेते
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 6:21 AM

मुंबई : राज्य सरकारने सरसकट लॉकडाऊनचा आततायी निर्णय अजिबात घेऊ नये, त्यापेक्षा नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्यावर जोर द्यावा, अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. गेल्या फेब्रवारी महिन्यापासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन किंवा निर्बंध घातले जात आहे. यावरुनच बाळा नांदगावकरांनी ट्वीट करत राज्य सरकारचे कान टोचले आहेत. (MNS Bala Nandgaonkar On Maharashtra Lockdown)

राज्य सरकारने सरसकट लॉकडाउनचा आततायी निर्णय अजिबात घेऊ नये. त्यापेक्षा नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्यावर जोर द्यावा. तसेच बाकी अनेक राज्यात जे आपल्या महाराष्ट्रापेक्षा अनेक अर्थाने मागे आहेत, तिथे मृत्यू दर हा अतिशय कमी आहे. हा ही सरकारसाठी संशोधनाचा विषय आहे. ते कमी चाचण्या करतात असे कारण देण्यापेक्षा आपल्या राज्यातील मृत्यूदर कसा कमी करता येईल याचे नियोजन करावे. आधीच आर्थिकदृष्टया त्रस्त जनतेला लॉकडाऊन करून अडचणीत आणू नये, असे ट्वीट बाळा नांदगावकर यांनी केले आहे.

बाळा नांदगावकरांचे ट्वीट 

कोणकोणत्या जिल्ह्यात लॉकडाऊन? 

राज्यातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी नाईट कर्फ्यू किंवा कडक निर्बंध लावले जात आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात हे निर्बंध लागू करण्यात आले आहे. नागपूर, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, औरंगाबाद याशिवाय अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून कठोर निर्बंध लादण्यात येत आहेत.

  • परभणी जिल्ह्यात 2 दिवसांचा लॉकडाऊन
  • नागपूरमध्ये येत्या 15 मार्चपासून ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन
  • जळगाव जिल्हा प्रशासनाने 12 ते 14 मार्च दरम्यान जनता कर्फ्यू
  • मीरा भाईंदरमध्ये कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर

राज्यातील कोरोना स्थिती काय? 

राज्यात काल (12 मार्च) 15 हजार 817 नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 लाख 82 हजार 191 इतकी झाली आहे. तर राज्यात आज 56 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.31 % एवढा आहे.

राज्यात काल 11,344 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर राज्यात आजपर्यंत एकूण 21,17,744 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.79% एवढे झाले आहे. (MNS Bala Nandgaonkar On Maharashtra Lockdown)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Lockdown | कुठे लॉकडाऊन, कुठे Night Curfew, कुठे कडक निर्बंध, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

चिंतेची बाब! कोरोनाचा विळखा वाढला, राज्यात 15 हजार 817 रुग्ण सापडले

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.