Tv9 Marathi स्पेशल रिपोर्ट! राज ठाकरे यांचा घातपाताचा प्रयत्न?

| Updated on: Feb 26, 2023 | 11:30 PM

नारायण राणे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले. त्यावेळी कोकणात राणेंविरोधात संघर्ष करायला कुणीही तयार नव्हतं. पण राज ठाकरेंनी पक्षाच्या आदेशानुसार कोकण गाठलं आणि तिथंच त्यांचा घातपात करण्याचा कट शिजला.

Tv9 Marathi स्पेशल रिपोर्ट! राज ठाकरे यांचा घातपाताचा प्रयत्न?
raj thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : शिवसेनेत असताना राज ठाकरे यांच्या घातपाताचा प्रयत्न होता असा गंभीर आरोप संदीप देशपांडे यांनी केलाय. संदीप देशपांडे यांच्या आरोपांना ठाकरे गटानंही प्रत्युत्तर दिलंय. पाहुयात. राज ठाकरेंविरोधात षडयंत्र रचलं गेलं? राज ठाकरेंच्या घातपाताचा प्रयत्न झाला?

राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यांच्या घातापाताचा प्रयत्न स्वकीयांकडून झाला असा गौप्यस्फोट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय. नारायण राणे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले. त्यावेळी कोकणात राणेंविरोधात संघर्ष करायला कुणीही तयार नव्हतं. पण राज ठाकरेंनी पक्षाच्या आदेशानुसार कोकण गाठलं आणि तिथंच त्यांचा घातपात करण्याचा कट शिजला होता असं देशपांडे म्हणालेत.

संदीप देशपांडेंनी केलेल्या या दाव्यात कुठलंही तथ्य नाही असा प्रत्युत्तर किशोरी पेडणेकर यांनी दिलंय. त्या वेळी आपणही राज ठाकरे यांच्यासोबत असल्याचा दावाही पेडणेकरांनी केलाय. संदीप देशपांडे यांचा उल्लेख पेडणेकरांनी चौका पांडे असा केलाय. बाळासाहेबांचे उत्तराधिकारी म्हणून जेव्हा राज ठाकरेंचं नाव पुढे यायला लागलं..त्याच वेळी राज ठाकरेंविरोधात ष़डयंत्राला सुरुवात झाली असंही देशपांडेंनी म्हटलंय.

संदीप देशपांडे म्हणाले… राज ठाकरेंचे नाव जेव्हा बाळासाहेबांच्या नंतरचा नेता म्हणून पुढे येत होते, तेव्हा 1995 ते 2000 पर्यंत त्यांच्या विरोधात षडयंत्र रचायला सुरुवात झाली. 2000 साली उद्धव ठाकरेंची अस्वस्थता वाढायला लागली. 2002 मध्ये बाळासाहेबांच्या इच्छेखातर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचे नाव कार्याध्यक्ष म्हणून घोषित केले.

राज ठाकरे 2005 साली शिवसेनेतून बाहेर पडले. 2006 साली त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष काढला. या गोष्टीला आता जवळपास 17 वर्षे झाली आहेत. त्यावेळी घडलेल्या कथित गोष्टींवरुन देशपांडेंनी उद्धव ठाकरेंना टार्गेट केलंय.