रतन टाटा आणि माझ्यातील एक समानता…; राज ठाकरे भावूक

Raj Thackeray Facebook Post About Ratan Tata : राज ठाकरे यांनी रतन टाटा यांच्याबाबत एक पोस्ट लिहिली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी रतन टाटा यांच्याबाबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राज ठाकरेंनी रतन टाटांसोबतचा एक व्हीडिओही पोस्ट केलाय. वाचा....

रतन टाटा आणि माझ्यातील एक समानता...; राज ठाकरे भावूक
राज ठाकरे आणि रतन टाटा यांच्या भेटीचा फोटोImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 10, 2024 | 11:36 AM

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं काल रात्री निधन झालं. त्यांच्या जाण्याने उद्योग विश्वात पोकळी निर्माण झाली आहे. रतन टाटा यांना जगभरातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि रतन टाटा यांचा स्नेह राहिला. रतन टाटा यांच्या निधनानंतर राज ठाकरे यांनी रतन टाटा यांच्यासोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत. रतन टाटा यांना श्वानांविषयी जिव्हाळा होता. राज ठाकरे हे देखील श्वानप्रेमी आहेत. हा एक धागा त्यांचं नातं अधिक दृढ होण्यात महत्वाचं ठरलं. राज ठाकरे यांनी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये देखील राज ठाकरे यांनी याबाबतचा उल्लेख केला आहे.

रतन टाटा यांचं श्वानप्रेम

रतन टाटांची अजून एक गोष्ट मला प्रचंड आवडायची ती म्हणजे त्यांचं श्वान प्रेम. आमच्यातली ही एक समानता. ताज हॉटेल समूहाच्या परिसरात असू देत की ‘बॉंबे हाऊस’ हे टाटा समूहाचं मुख्यालय, तिथे भटक्या श्वानांची पण उत्तम काळजी घेतली जायची. रतन टाटांच्या श्वान प्रेमाबद्दलचा एक किस्सा मी एके ठिकाणी वाचला होता. रतन टाटांना त्यांच्या दातृत्वाचा गौरव करणारा एक खूप मोठा सन्मान लंडनमधल्या बकिंगहॅम राजवाड्यात होणार होता. पण अगदी ऐनवेळेला त्यांनी त्यांचा कार्यक्रम रद्द केला कारण त्यांच्याकडच्या ‘टॅंगो’ आणि ‘टिटो’ या दोन श्वानांपैकी एक, खूप आजारी होता. रतन टाटांनी प्रिन्स चार्ल्स यांना कळवलं की अशा स्थितीत मी माझ्या श्वानांना सोडून येऊ शकत नाही. रतन टाटा माणूस म्हणून किती मोठे होते हे या उदाहरणातून जाणवतं, असं राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.

राज ठाकरे यांनी विनंती केल्यानंतर रतन टाटा यांनी नाशिकच्या बोटॅनिकल उद्यानाला भेट दिली. तेव्हाच्या आठवणी राज ठाकरे यांनी शेअर केल्यात. राज ठाकरे यांनी रतन टाटा यांच्यासोबतचा व्हीडिओ शेअर केला आहे.

राज ठाकरे यांची पोस्ट

नाशिकच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काळात, आम्ही अनेक प्रकल्प सीएसआर निधीतून उभारले. आणि नाशिक सुंदर करावं म्हणून ज्या ज्या कल्पना मी देशातील नामवंत उद्योजकांसमोर मांडल्या, त्या प्रत्येकाने मला तात्काळ होकार दिला. नाशिकमध्ये एक बोटॅनिकल उद्यान सुरु करावं अशी माझी इच्छा होती, त्यासाठी मी रतन टाटांना सीएसआरमधून निधी द्यावा अशी विनंती केली आणि त्यांनी मला लगेच होकार दिला. इतकंच नाही सुरुवातीला जो निधी मंजूर केला त्यापेक्षा अधिक निधी काम वाढतंय म्हणून लागणार आहे हे पाहून, तो निधी पण मंजूर केला.
बोटॅनिकल उद्यान पूर्ण झाल्यावर मी रतन टाटांना विनंती केली तुम्ही स्वतः या उद्यानाला भेट दिलीत तर उत्तम होईल. खरंतर जागतिक पातळीवर काम करणारे उद्योगपती असं सहजासहजी कुठे जात नाहीत, पण रतन टाटा नाशिकला आले. त्यांनी आम्ही उभारलेलं उद्यान पाहिलं. आणि नंतर माध्यमांशी बोलताना, माझ्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांमध्ये कौतुक होतं, पण मला तो त्यांनी दिलेला आशीर्वाद वाटला. मी भाग्यवान आहे रतन टाटांसारख्या अनेक दिग्गजांनी मला प्रेम दिलं, आशीर्वाद दिले.
त्यांनी व्यक्त केलेल्या भावनेची ही चित्रफीत, जरूर पहा

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.