मनसेच्या संदीप देशपांडेंचा टॉस, आदित्य ठाकरेंची जोरदार बॅटिंग; कुठे, कसं आणि काय घडलं?

वरळी विधानसभा मतदारसंघात सध्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे विद्यमान आमदार आहेत. आदित्य ठाकरे हे गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी वरळीमधून बिनविरोध निवडून गेले होते. आता परिस्थिती वेगळी आहे. कारण मनसेचे संदीप देशपांडे यांचं कडवं आव्हान त्यांना यावेळी असण्याची शक्यता आहे. असं असताना या दोन्ही नेत्यांनी एकाच मैदानात टॉस उडवल्याची आणि बॅटिंग केल्याची माहिती समोर येत आहे.

मनसेच्या संदीप देशपांडेंचा टॉस, आदित्य ठाकरेंची जोरदार बॅटिंग; कुठे, कसं आणि काय घडलं?
मनसेच्या संदीप देशपांडेचा टॉस, आदित्य ठाकरेंची जोरदार बॅटिंग
Follow us
| Updated on: Jun 24, 2024 | 9:06 PM

लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात पुढच्या चार महिन्यांनी विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. प्रत्येक पक्ष विधानसभेसाठी रणनीती आखत आहे. विशेष म्हणजे काही इच्छुक नेत्यांकडून आता त्या-त्या मतदारसंघांमध्ये दौरे देखील सुरु झाले आहेत. आपापल्या मतदारसंघामध्ये फिरुन नागरिकांच्या भेटीगाठी घेणं, नागरिकांची विचारपूस करणं, तसेच विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं हे आता अनेक नेत्यांनी सुरु केलेलं बघायला मिळत आहे. मुंबई शहरसुद्धा याला अपवाद नाही. मुंबईत इतर पक्षांप्रमाणे मनसे पक्ष सुद्धा चांगलाच कामाला लागला आहे. मनसे या निवडणुकीत वरळी विधानसभा मतदारसंघासाठी तयारी करत आहे. मनसेकडून संदीप देशपांडे यांना वरळी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे संदीप देशपांडे यांनी वरळीत भेटीगाठी आणि मतदारसंघाचा दौरा सुरु केला आहे.

दुसरीकडे वरळी विधानसभा मतदारसंघात सध्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे विद्यमान आमदार आहेत. आदित्य ठाकरे हे गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी वरळीमधून बिनविरोध निवडून गेले होते. ठाकरे गटाकडून तशी रणनीती आखण्यात आली होती. ठाकरे गटाने त्यावेळी बिनविरोधसाठी केलेला प्रयत्न यशस्वी ठरला होता. पण यावेळी वातावरण भरपूर वेगळं आहे. कारण ठाकरेंच्या शिवसेनेतच फूट पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचं आव्हान ठाकरे गटासमोर आहे.

मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणाऱ्या मनसे पक्षाचं आव्हान ठाकरे गटाला आहे. या आव्हानांचा विचार पाहता आदित्य ठाकरेंकडूनही आपल्या मतदारसंघाचे दौरे केले जात आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडूनही आपल्या मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना भेटीगाठी दिल्या जात आहे. असं असताना वरळी मतदारसंघात एका मैदानात एक अनोखा योगायोग घडून आलेला बघायला मिळाला आहे. या योगायोगाची राजकीय वर्तुळ आणि वरळीकरांमध्ये चांगलीच चर्चा रंगलेली बघायला मिळत आहे.

संदीप देशपांडेचा टॉस, आदित्य ठाकरेंची जोरदार बॅटिंग

वरळी मतदारसंघात मनसेकडून दौरे आयोजित केले जात आहेत. स्वतः संदीप देशपांडे वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उतरणार असल्याच म्हटलं जातंय. वरळी मतदारसंघातील ना. म. जोशी मार्गावरच्या महाराष्ट्र हायस्कूल मैदानावर स्थानिक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस मनसेच्या संदीप देशपांडे यांनी काल सकाळी 11 वाजता टॉस करून क्रिकेट सामन्यांचं उद्घाटन केलं. देशपांडे यांनी सकाळी टॉस उडवला. मात्र संध्याकाळी येऊन आदित्य ठाकरे यांनी जोरदार बॅटिंग केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मनसेनं वरळी विधानसभेवर लक्ष केंद्रीत केलेलं आहे. मात्र स्थानिक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनात मनसेने उद्घाटन केलेल्या पीचवर आदित्य ठाकरे यांच्या षटकाराची देखील चर्चा रंगली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.