दसरा मेळाव्याचं बाळासाहेब ठाकरेंचं भाषण म्हणजे पर्वणी, आता सगळंच अळणी : संदीप देशपांडे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर आणि उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी हिंदुहृदयसम्राटांचं भाषण म्हणजे असायची पर्वणी आता मात्र सगळंच अळणी, गरम पाण्याच्या नावाखाली नुसतंच कोमट पाणी, अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस संदीप देशापांडे यांनी टीका केलीय.

दसरा मेळाव्याचं बाळासाहेब ठाकरेंचं भाषण म्हणजे पर्वणी, आता सगळंच अळणी : संदीप देशपांडे
संदीप देशपांडे
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 11:12 AM

मुंबई: शिवसेनेचा दसरा मेळावा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या मेळाव्या उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार तोफ डागत सेनेच्या आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट केली. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर आणि उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी हिंदुहृदयसम्राटांचं भाषण म्हणजे असायची पर्वणी आता मात्र सगळंच अळणी, गरम पाण्याच्या नावाखाली नुसतंच कोमट पाणी, अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस संदीप देशापांडे यांनी टीका केलीय.

संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले?

दसरा मेळाव्याच्या दिवशी हिंदुहृदयसम्राटांचं भाषण म्हणजे असायची पर्वणी असायची. आता मात्र सगळंच अळणी असून गरम पाण्याच्या नावाखाली नुसतंच कोमट पाणी असल्याची टीका संदीप देशपांडे यांनी केली. मी लहानपणापासून दादरला राहतो. दसरा मेळावा हा शिवतीर्थावर व्हायचा त्या वेळेला आम्ही सर्व जण सन्माननीय हृदयसम्राट बाळासाहेबांचे भाषण ऐकायला जायचो. खरंच ती एक पर्वणी होती नवीन विचार मिळायचा नवीन दिशा महाराष्ट्राला मिळायची, असं देशपांडे म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांमध्ये एक उर्जा असायची आता काय सगळ अळणी झालेलं आहे. मीठ नसलेल्या जेवणासारखं कालचं भाषण होतं आणि त्यामुळेच अशा पद्धतीचा आता लोकांना ही कंटाळा वाटायला लागलेला आहे.

ही नवी शिवसेना

मला काय ते हिंदू आणि नवं हिंदूत्वाबद्दल कळत नाही पण नवीन शिवसेना आहे असं मला वाटतं. ही नवीन शिवसेना बाळासाहेबां च्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेसच्या मांडीवर बसली आहे. हिंदू आहे की नाही माहीत नाही पण नवीन शिवसेना नक्की आहे, असं देशपांडे म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांचीही टीका

ईडीच्या कारवायांवरून मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला होता. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मोदी एजन्सींचा वापर करण्याच्या विरोधात आहेत. ते कधीच एजन्सीचा गैरवापर करत नाहीत. आम्ही यंत्रणांचा गैरवापर केला असता तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात असतं, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला आहे. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एजन्सींच्या वापराच्या विरोधात आहे. कधीही ते एजन्सीचा गैरवापर करू देत नाहीत. एजन्सीच्या कामातही येत नाहीत. एजन्सीचा राजकीय वापर करू देत नाही. अन्यथा एजन्सीचा वापर केला असता तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात गेलं असतं, असं फडणवीस म्हणाले.

इतर बातम्या:

मोठी बातमी ! अजित पवारांच्या नातेवाईकांकडे आयकर विभागाला धाडीत नेमके किती कोटी सापडले? पहिल्यांदाच आकडा जाहीर

VIDEO: मोठ्या भावाविरोधात ठाकरेंनी रणशिंग फुंकलं? दसऱ्याच्या भाषणात ड्रग्ज, अदानी, गांजा, निधीवर थेट मोदींना सवाल

MNS Leader Sandeep Deshpande slam Shivsena Dasara melava Uddhav Thackeray Speech

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.